त्या रात्री स्वतःला आवरणं मला अशक्य झालं ! मी टेबलापाशी बसलों आणि समोरचे कागद पुढं ओढले. आणि मग मनातल्या भावनांच्या समुद्रांतून भाषेचा ओघच्या ओघ कागदावर वाहू लागला. शब्दांचा सैरावैरा लोंढाच्या लोंढा आला आणि त्यांतून सुमित्रा गोखले आकार घेऊं लागली. तिचं भोळंभाबडं व्यक्तिमत्व त्यांतून साकार होऊं लागलं. त्या मुलीच्या आत्महत्येपासून अंधुकपणे मनांत वावरत असलेली ती कथा एखाद्या चित्रासारखी कागदांवर उतरू लागली. आणि किरकोळ, सर्वसामान्य माणसांप्रमाणं दुबळं प्रेम करणाऱ्या सुमित्रा गोखलेच्या व्यक्तिमत्वाला प्रेमासाठी आत्महत्या करणाऱ्या धीरोदात्त नायिकेच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा मुलामा चढू लागला...
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .