वा! क्या बात है ! वाचकहो, सर्व अंदाजांना खोटं ठरवीत तुम्ही पुनश्चची वाचकसंख्या हजारावर नेऊन पोचवलीत. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. गेल्या महिन्यात ७०० हून जास्त लोकांनी आपले पुनश्चचे app मोबाईलवर download करून घेतले. पण आमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे की या वाचकांना सशुल्क चे लेख वाचता येत नाहीयेत. मला व्यक्तीशः ओळखत नसल्यामुळे तसंच 'काही लेख वाचूनच १०० रुपये भरुया' असा विचार करीत असल्यामुळे अजून हे वाचक सशुल्क सभासद झालेले नाहीत. त्यांच्यासाठी आम्ही विचार केलाय. या महिन्यापासून आपण एक 'चाचणी सभासदत्व' तयार केलंय. यात नोंदणी केलेल्यांना पहिले १५ दिवस सर्व लेख ( सशुल्कसहित ) वाचता येतील, कमेंट्स टाकता येतील. या app चा सर्वंकष वापर करून १०० रुपये भरायचे की नाही हा निर्णय घेता येईल. १०० रुपये भरले की सभासदत्व पुढे सुरु राहील. नाहीतर ते संपून जाईल. चाचणी सभासदत्व मिळण्यासाठी तुम्हाला एव्हढंच करायचंय... एखाद्या सशुल्क लेखावर क्लिक करा. पहिल्या काही ओळींनंतर 'आपल्याला योग्य वाटेल असा पर्याय निवडा' हे तुम्हाला निळ्या रंगात दिसेल. त्यावर क्लिक करा. त्या पानावर चाचणी ( trial ) सभासदत्वाचा पर्याय निवडा आणि आवश्यक ती नोंदणी पूर्ण करा. झालं काम. बनलात तुम्ही आमचे पाहुणे सभासद. वाचा, ठरवा आणि मग पुनश्चचे सशुल्क सभासद व्हा. लक्षात ठेवा, एका लेखाचे मूल्य फक्त १ रुपया आहे. ( १०४ लेख १०० रुपयात ). तुम्हाला जर हे लेख तेवढ्या उंचीचे वाटले नाहीत तर अजिबात सभासद होऊ नका. सशुल्क सभासदांना पण एक चांगली बातमी आहे. आजवर त्यांची तक्रार होती की त्यांना आवडलेला लेख त्यांनी whatsapp किंवा फेसबुकवर शेअर केला तरी ज्यांच्याशी तो शेअर केलाय त्यांना तो लेख वाचता येत नसे. आता तसं होणार नाह ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .