जामीन राहणे : एक धर्म (आणि) संकट

पुनश्च    उदय कर्वे    2018-04-14 06:16:02   

महान नाटककार शेक्सपिअर पासून ते भारतीय संतांपर्यंत सर्वानीच कर्जव्यवहार, जामीन राहणे इ. बद्दल खूप छान व महत्त्वाचे काही सांगून ठेवले आहे. मराठीत ”फटका” या काव्यप्रकारातील प्रसिद‍्ध कवीने तर ”स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामीन कोणा राहू नको” असा उपदेशच केला आहे. परंतु आपला एखादा नातलग, मित्र वा परिचित काही कारणांनी, काही गोष्टींसाठी कर्ज काढत असतो व त्या कर्जासाठी आपल्याला जामीन राहण्यास सांगतो. अशा वेळी तो आपला जवळचा मित्र, नातलग असेल (व त्याच्या बद्दल आपले मतही चांगले असेल ) तर त्याला जामीन (गॅरेेंटर) राहणे हे आपले कर्तव्य ठरते. पण त्याच वेळी, काही कारणांनी तो ते कर्ज भविष्यात फेडू शकला नाही तर ...? या शक्यतेमध्ये एक संकटही दडलेले असते. कर्ज रक्कम  जेवढी मोठी तेवढे हे संभाव्य संकट ही मोठे असते. अशा अनेक प्रसंगांत आपले मन सांगते की ”जामीन राहायला पाहिजे” पण बुद्धी सांगत असते ”नको राहूस जामीन” किंवा  ”जरा सांभाळून ”! आणि मग या बाबतीत कधीकधी दोन टोकांच्या भूमिका घेणारी माणसे दिसतात. माझा सी. ए. चा व्यवसाय करताना व बँकेच्या संचालकपदी काम करताना मला अशा अनेक व्यक्ती माहीत झाल्या की ”आम्ही कोणासही, जामीन राहत नाही” हे त्यांचे जाहीर धोरण असते. तर याउलट अशा काही व्यक्ती बघितल्या की त्या ”येथे कोणाहीसाठी जामीन मिळतील” असा जणू जाहिरात फलकच लावून असतात. त्या कोणालाही, कशाहीसाठी बिनधास्त जामीन राहत असतात. पण ही झाली दोन अजब टोके! यातला योग्य व मध्यम मार्ग काय असा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अर्थकारण

प्रतिक्रिया

  1. shubhada.bapat

      7 वर्षांपूर्वी

    डोळ्यात अंजन

  2. RaviTorne

      7 वर्षांपूर्वी

    upaukta mahiti milalai ddhanywad Uday Karveji

  3. प्रकाश हिर्लेकर

      7 वर्षांपूर्वी

    एकदा एका सहकारयाला मद्यपाशातून बाहेर काढण्यासाठी मी व माझा मित्र जामीन राहिलो.ना त्याचा मद्यपाश् सुटला , ना आमचा जामीनपाश.

  4. charushende

      7 वर्षांपूर्वी

    अतिशय उपयुक्त माहिती व मार्गदर्शन केले आहे. आभार.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts