वसुंधरेचा गत इतिहास

पुनश्च    प्रभूनाम    2018-09-22 06:00:16   

********** लेखक- श्री. प्रभुनाम वसुंधरेचा जन्म नेमका कसा झाला हे अद्याप नीटसं समजलं नसलं, तरी तो किमान ३ अब्ज म्हणजे ३०० कोटी वर्षांपूर्वी झाला असला पाहिजे अशी खात्री भूशास्त्रज्ञ देतात. जन्मल्या वेळी वसुंधरा ही एक तप्त गोळा होती आणि हा तप्त गोल पुढे कोट्यवधी वर्षे सावकाशपणे निवत होता. त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर खडकाचं कवच तयार झालं. पृष्ठभाग बराचसा थंड झाल्यानंतर वातावरणातील पाण्याची वाफही थंड होऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठिकठिकाणी मोठमोठे जलाशय तयार झाले. हेच अगदी सुरुवातीचे सागर होत. आणि याच जलाशयातून वसुंधरेच्या पाठीवर आढळणाऱ्या जीवसृष्टीचा उगम झाला. जीवसृष्टीचा उदय झाल्यानंतर पुढे सजीवांचा कसकसा विकास होत गेला, त्यात कोणकोणते बदल घडून आले, त्यातून नवीन जाती तयार होत होत अखेर आज दिसणारे असंख्य प्रकारचे प्राणी आणि वनस्पती कशा अस्तित्वात आल्या, याचा मागोवा घ्यावयाचा म्हणजेच वसुंधरेच्या गत इतिहासाचा अभ्यास करावयाचा. या गत इतिहासाची माहिती मिळविण्याची साधने कोणकोणती आहेत हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. तुमच्यापैकी कित्येकजण रोज नियमानं रोजनिशी लिहीत असाल. तसंच पूर्वी राजेरजवाडे यांच्या दरबारच्या हकीकती बखरीतून लिहून ठेवलेल्या सापडतात. त्यावरून त्या त्या काळचा सुसंगत गतेतिहास लावता येतो. वसुंधरेनं सुद्धा अशाच प्रकारची रोजनिशी लिहून ठेवली आहे. मात्र वसुंधरेच्या लिखाणाची भाषा आणि लिपी मात्र सांकेतिक भाषेसारखी फार अवघड आणि किचकट आहे. इतिहास संशोधकांना जसे जुने जुने कागदपत्र मोठ्या कष्टाने जमा करून आणि त्यातील भाषेचा आणि लिपीचा अभ्यास करून जुन्या घटनांना सुसंगत अर्थ लावावा लागतो तसेच परिश्रम भूशास्त्रज्ञांना पृथ्वीचा गत इतिहास समजून घेण्यासाठी क ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


माहिती , सृष्टीज्ञान , प्रभूनाम

प्रतिक्रिया

  1. Anil95

      7 वर्षांपूर्वी

    अप्रतीम.

  2. raginipant

      7 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण लेख उत्तरार्धा वाचायला आवडेल

  3. deepa_ajay

      7 वर्षांपूर्वी

    मस्त उत्तरार्ध वाचायला नक्की आवडेल

  4. 9322496973

      7 वर्षांपूर्वी

    झकास. खूपच छान माहिती मिळाली. मनःपूर्वक धन्यवाद

  5. sureshjohari

      7 वर्षांपूर्वी

    खूप माहितीपूर्ण लेख . आवडला

  6. kanha

      7 वर्षांपूर्वी

    खूपच उपयुक्त माहिती उत्तरार्ध वाचायला आवडेल

  7. shailesh71

      7 वर्षांपूर्वी

    छानं ! पूर्वार्ध वाटला, उत्तरार्ध वाचायला आवडेल.

  8. shrikantkekre

      7 वर्षांपूर्वी

    अश्या अभ्यासपूर्ण लेखांसाठीच सभासद झालो होतो.

  9. manjiriv

      7 वर्षांपूर्वी

    पुनश्च मुळे जुने माहितीपूर्ण लेख वाचायला मिळत आहेत.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts