ललनांच्या लावण्याचे हानिलाभ

पुनश्च    वि. दा. सावरकर    2019-05-10 10:00:35   

अंक – रहस्यरंजन, जून १९५८  

जिच्या कौमार्यांत लावण्याचा नेत्रानंददायी चंद्र आरोग्याच्या सफल कलानी प्रफुल्ल झालेला आहे; यौवनांत जिच्या उदरी देवदूतांसारखी सुंदर नी सुलक्षणी बालके जन्मली आहेत आणि त्यांना त्या आपल्या लावण्याचे नी शीलाचे ते वत्सल दूध पाजून संवर्धितांना जी स्वतः प्रतिपदेच्या चंद्रकोरीसारखी क्षीण कलांनीच पूर्ण कलांपेक्षांही प्रौढास्थेत सुमग भासत आहे; त्या जननीला आमचे शतवार वंदन असो! पर्यायपीतम्य सुरिंहमांशोः। कलाक्षयः श्लाघ्यतरी हि वृद्घेः।। युरोपमध्ये सध्यां सौंदर्याची जिकडेतिकडे पूजा होत आहे पण पूर्वी एकदां याच युरोपमध्ये रोमन कॅथॉलिक पंथाचे वर्चस्व चालू असतां लावण्य हे ललनांच्या अंगचा, पुरुषांनी ज्यापासून अत्यंत सावध रहावे असा एक घातक दोष समजला जाई. त्या काळच्या युरोपीय धार्मिक वाङ्मयांत या घातक लावण्याची यथेच्छ निर्भत्सना केलेली आढळते. ख्रिश्चन धर्मांत जीजसच्या खालोखाल ज्यांचे शब्द धर्माज्ञेसमान पवित्र मानले जातात, त्या सेंट पॉल, सेंट पीटर प्रभूती आद्या महंतांच्या प्रत्यक्ष बायबलमध्येच ग्रंथिलेल्या उपदेशांतून स्त्री-स्वातंत्र्याची, स्त्री-मोहाची आणि एकंदर स्त्रीत्वाची कशी विटंबना केलेली आहे हे बायबलमधील खालील दोन उताऱ्यांवररून दिसून येईल- “स्त्रियांनी चर्चमध्ये मौन धारण केले पाहिजे! कारण तिथे बोलण्याची त्यांना आज्ञा नाही. अज्ञान हाच त्यांचा मूळ स्वभावधर्म. त्यांतही जे शिकणे ते घरच्याघरी, आपल्या पतीकडूनच शिकले पाहिजे. कारण चर्चमध्ये बोलणे स्त्रियांना लज्जास्पद आहे !(Carinthians xiv, 34).” ‘पत्नीनों, आपल्या पतीलाच तुमच्या सर्वस्वाचा स्वामी माना! ख्राईस्ट जसा जगाचा प्रमुख धनी आहे, तसाच पती हाच पत्नीच्या नेता आहे; स्वामी आहे...आदमनंतर ईव्ह उपजली. 

लेखक – वि.दा. सावरकर

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


दीर्घा , सावरकर , रहस्यरंजन

प्रतिक्रिया

  1. Medha Vaidya

      4 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर लेख

  2. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    तात्यारावांनी याही विषयावर किती सुंदर लिहिले आहे. खरच प्रत्येक विषयांमध्ये अगदी मुळात जाऊन मुद्देसूद लिहीण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.

  3. Vilas Ranade

      4 वर्षांपूर्वी

    स्त्रियांच्या सौंदर्याबाबत सावरकरांनी अतिशय सुंदर शब्दात छान वर्णन केले आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts