सरली सुरेख थंडी फोफावला ऊन्हाळा संतप्त सूर्य आता ओकेल तप्त ज्वाळा पक्षी दिशा दिशांना फिरतील ते थव्यांनी सुकतील कंठ त्यांचे मग शोधतील पाणी सुकली तळी जळांची पाणी पिण्यास नाही त्या सानुल्या जिवांची होईल लाही लाही त्यांच्या जिवाकरिता इतकी कराच सेवा वाटीत एवढेसे पाणी भरून ठेवा ?? .. एका माणसाने खरंच वाटी भर पाणी पक्षांसाठी ठेवले आणि पुढे काय घडल? त्या पक्षांमधे आणि माणसामधे काय संवाद झाला ?त्याचे वर्णन खालच्या कवितेत केलय वाटीत पाणी बघता ऐटीत पक्षी आला चोचीत थेंब घेता मना मधे म्हणाला येतो घेउनि आता घरट्यातल्या पिलाला सोय आजची हि झाली भय उद्याचे कशाला वाटीतल्या जळाची चर्चा चिकार झाली गावात विहगांच्या सभेत नोंद झाली आहे कुणीतरी या गावात चांगाला बा पात्रात पाणी ठेवी म्हणतो आम्हास हे घ्या ! धामात सज्जनाच्या काही पक्षीगण गेले हालवित पंख छोटे त्यातील एक बोले पात्रात पाणी या का आम्हास ठेवले तु? नाही मनुष्य आम्ही तरि परोपकारिले तु! जातीस जात भीते हे दीस आजचे आले माणुस माणसाशी आज शत्रुसमान वागे हे रोज पाहण्याची सवय आम्हाला झाली हे असे असता पाणी कोण परांस घाली? हे पहावया मनुजा तुझ्या समीप आलो उपकार कसा मी घेउ? म्हणुन बोलता झालो ऐकुन प्रश्न भोळा यजमान सुन्न झाला लज्जीत वदनाने पुढे बोलता झाला हे दान नाही मित्रा उपकार फेडतो मी वाटीतल्या जलाचे काज सांगतो मी तोडले वृक्ष आंम्ही निसर्ग उजाड झाला उखडून घरटी तुमची विश्राम आम्ही केला वनास तोडुन आम्ही शहरात वास केला उत्तुंग इमारतीचा आम्हीच माज केला परंतु विश्रामधामी विश्रांती ना मनाला तळमळ अंतरीची न सांगता ये कुणाला यंत्रे श ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Mohan Pote
4 वर्षांपूर्वीह्या कवितांचे कवी कोण आहे.
Shashikant-Anjanikar
5 वर्षांपूर्वीखूप छान
sudhir.gaikwad.7311@gmail.com
5 वर्षांपूर्वीसगळं काही मुक्याजिवांसाठी .....!
Rdesai
6 वर्षांपूर्वीखूप छान !
Ilhe sukhadev kisan
6 वर्षांपूर्वीVery nice