७ मे ला वामन तावडे गेले, काल बोरीवलीला प्रबोधनकारमध्ये त्यांची स्मृती सभा घेतली , मोजकेच परंतु जवळचे लोक तेथे होते. इथे मी कोणाचीही नावे मुद्दाम घेत नाही कारण सर्वच वामन याचे जवळचे होते. खूप आठवणी निघाल्या अगदी छिन्न पासून ते कालपरवा पर्यंत . प्रत्येकाला वामन वेगवेगळा दिसत होता एक कॅलडिस्कोपप्रमाणे त्याचे गुणदोष सगळ्यावर खूप चर्चा झाली अनेकांनी आपले अनुभव सांगितलेकाल जर वामन तेथे असता तर सॉलिड खुश झाला असता आपण कोणीतरी आहोत हे त्याला पटले असते. अनेकजण बोलत होते माझी आणि वामन तवडेची भेट चिन्ह नाटक चालू होते नाटक झाल्यावर मी ग्रीनरूममध्ये गेलो बरीच गर्दी होती माझा मित्र प्रवीण दवणे म्हणाला हेच ते वामन तावडे, बुटका , लहानखुरा माणूस केस अस्ताव्यस्त चेहराच सांगत होता त्याचे विमान नुकतेच लँड झालेले असेल किंवा होत असेल. हे वामनाचे पाहिले दर्शन मला झाले. चिन्ह नाटक तर पार डोक्यात घुसलेले होते , कारण माझ्या भोवती एक चिन्ह सारखेच पण वेगळे प्रकरण घडत होते. म्हणून मला ते खूप अस्वस्थ करून गेले. तसे ते नाटक डोक्यात घुसलेच होते. त्यानंतर २५ वर्षाने परत वामन भेटला तो पांढऱ्या टोपीत मराठी ग्रंथसंग्रहालयात , हे वामन तावडे माझा मित्र गोकुळने ओळख करून दिली आम्ही एकत्र काम करतो , त्याची रज्जू पुस्तकावर सही घेतली. परत मध्ये काही वर्षे गेली आणि महेंद्र तेरेदेसाईमुळे ओळख वाढली , त्याचबरोबर फेसबुक मुळे जास्त. माझ्या डोबिवलीच्या घरी माझ्या स्वाक्षरीच्या घरात स्वाक्षरी केली , म्हटले एक स्केच काढा त्याने ते स्केचकाढले आणि मी ते fb वर टाकले , व्हाट्स अप वर टाकले सकाळीच फोन वामनाचाआयला तू मला एकदम फेमस केलेस खूप लोक मेसेज करत आहेत फोन करत आहेत. मी भाव खाऊन म्हणालो मग तुमच्या सारख्या ग्रेट माणसाल ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
सुधन्वा कुलकर्णी
6 वर्षांपूर्वीनमस्कार, जमल्यास तुम्हीच सविस्तर लिहा. आपण इथेच स्वतंत्र लेख म्हणून तो प्रसिद्ध करू. या सदराचा उद्द्येश खऱ्या अर्थाने सफल होईल.
arya
6 वर्षांपूर्वीत्रोटक आहे. तपशीलाने लिहायला हवं होतं. वामनची व्यक्तिरेखा दोन फोन काॅल व तीन परिच्छेदात वर्णन ... यातून उभी राहात नाही. व्यक्तिचित्र उभे करण्यात अपयश..