विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आपल्या साहित्याने, वक्तृत्वाने व विविध जीवनक्षेत्रांतील दमदार संचाराने महाराष्ट्रावर, मराठी मनावर विलक्षण प्रभाव टाकणारे आचार्य अत्रे हे खरोखरीच एक अद्भुत रसायन होते. काल १३ जून रोजी त्यांच्या मृत्यूला पन्नास वर्षे पूर्ण झाली, तरी अत्रेंचा महिमा महाराष्ट्रात टिकून आहे. नाटककार, विडंबनकार, विनोदी साहित्यकार, कथालेखक, चित्रपटदिग्दर्शक,पटकथाकार, संवादलेखक, आत्मचरित्रकार, बालवाङ्मयकार, शिक्षणतज्ज्ञ,वैचारिक साहित्यकार, अनुवादक,कवी अशी अत्रे यांची अने रुपे होती. त्याबरोबरच वक्ता, राजकीय पुढारी, संपादक अत्रे, अशा त्यांच्या वास्तव जीवनातील विविध भूमिकाही तेवढ्याच जबरदस्त आणि अफाट होत्या.त्यांच्यावर अलोट प्रेम करणारी माणसं होती, तशी त्यांच्या कटू, जिव्हारी लागणाऱ्या वाग्बाणांनी दुखावली गेलेली माणसंही खूप होती. अत्रेंचा स्नेह आणि सहवास लाभलेल्या मनोहर महादेव आळतेकर यांनी प्रस्तुत लेखात अत्रेंविषयी अतिशय प्रेमाने आणि तरीही तटस्थपणे लिहिलेला, अत्रेंविषयीच्या दंतकथा, अनेक खरे-खोटे किस्से यांनी संपन्न असलेला हा लेख वाचून अत्रेंच्या व्यक्तिमत्वाचे मोठेपण आणि त्यातील गुंतागुंत दोन्ही लक्षात येते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Sharad Bahadkar
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख . श्री. प्रा. मनोहर आळतेकरांनी आचार्य अत्रे यांची सर्वांगानी अोळख आम्हास करुन दिली त्याबद्दल त्यांचे शतश: आभार ! खरंच आज अत्रे हवे होते.
Santoshkumar Ghorpade
4 वर्षांपूर्वीछान अप्रतिम लेख
Chandrakant Chandratre
4 वर्षांपूर्वीज्यांनी कऱ्हेचे पाणी भाग १ ते ५ वाचले आहेत त्यांना अत्र्यांच्या महान व्यक्तिमत्वाची कल्पना यावी. त्यांचे शिक्षण, चित्रपट, यातील बरे वाईट अनुभव, परदेशी जाऊन केलेला अभ्यास, सावरकर, फुले, आंबेडकरांबाबत आदर हे बराचवेळा दुर्लक्षीत होतात व उथळ बाबी की ज्या त्यांच्या जीवनाचा १ % भाग देखील नाही त्यावर जास्त लिहीले जाते. कऱ्हेचे पाणी सगळ्यांनी आवर्जून वाचावे.

Suresh Kulkarni
4 वर्षांपूर्वीनक्कीच प्रत्येक अत्रेप्रेमीने वाचलाच पाहिजे असा प्रदीर्घ लेख.वाचून मन तृप्त झाले????
Suresh Kulkarni
4 वर्षांपूर्वीनक्कीच प्रत्येक अत्रेप्रेमीने वाचलाच पाहिजे असा प्रदीर्घ लेख.वाचून मन तृप्त झाले????
Vinayak Bapat
4 वर्षांपूर्वीअत्रे यांनी किती क्षेत्रांत मुसाफिरी केली आहे हे त्यांना ठाऊक आपण फक्त अंचबित होतो.
Shriniwas Lakhpati
4 वर्षांपूर्वीखुप-छान लेख ! आचार्य-अत्रे म्हणजे अफाट-अचाट व्यक्तिमत्त्व होतं. अशा दिग्गजांचा दीर्घकाळ सहवास मनोहर आळतेकरांना लाभला. त्यांचं भाग्य थोरच मानलं पाहिजे. अत्र्यांसारखा माणूस मराठी भाषेत जन्माला आला म्हणून मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध झाली,जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. अत्रे अजून पंधरा वर्षे धडधाकट राहिले असते तर त्यांनी महाराष्ट्राला बेळगाव आरामात मिळवून दिले असते असे मला नेहमी वाटत आलेय. आचार्य-अत्र्यांचे वर्णन आचार्य-अत्र्यांच्याच शब्दात करायचे झाले तर " असा माणूस गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही आणि इथून पुढे दहा हजार वर्षात होणार नाही." -- श्रीनिवास-लखपती-पनवेल.

Prathamesh Kale
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख. आचार्य अत्रे ..महान ,लेखक ,कवि,थोर साहित्यिक .. सदर लेख खुपच छान .महान लेखकाला सुंदर शब्दांकन ....
आचार्य अत्रे हे बहुआयामी व्यक्तिमत्व मराठी साहित्यविश्वात होते हे पुढील पिढीला सांगून ही खर वाटणार नाही. उत्तम लेख , धन्यवाद !
Kantilal-Oswal
5 वर्षांपूर्वीछान,लेख....
baburaoshinde50@gmail.com
5 वर्षांपूर्वीछान...!
Suhas Bokil
5 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख ! अत्रे ह्याा व्यक्तीवर कितीहि लिहीले तरी ते कमीच असते.."
Samson mohite
5 वर्षांपूर्वीखुप छान
rohanjagtap
6 वर्षांपूर्वीउत्तम लेख! या लेखामुळे आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्त्व अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता आले.
harshadp
6 वर्षांपूर्वीखूप छान लेख! असा लेख गेल्या दहाहजार वर्षांत झाला नाही!