बौद्धसम्प्रदायाचा विनाश- भाग १


ज्या बुद्धाविषयी हिंदुधर्मीयांनी आपल्या अंतःकरणातील उदात्ततम भावना व्यक्त केली, त्या बुद्धाचा देशव्यापी संप्रदाय हिंदुधर्मीयांनी नष्ट केला, बौद्ध धर्मीयांचा अपरिमित छळ करून ब्राह्मणांनी किंवा वर्णाश्रम धर्मरक्षक नृपतींनी बौद्ध संप्रदाय भारताबाहेर घालवून दिला असा प्रचार सर्वत्र करण्यात येतो. पण इतिहासाची साक्ष अगदी निराळी आहे. ती कशी ते पहा- भारतीय शासनाने निधार्मिकतेची घोषणा वारंवार करून स्वतःच्या धार्मिक निःपक्षपातीपणाची ग्वाही कितीही दिली असली, तरी धर्म हा समाजजीवनाचा अविच्छेदक भाग असल्याने निधार्मिक शासनकर्त्यांनासुद्धा प्रसंगोपात्त निरनिराळ्या धर्मानुयायी समाजाची अंतरे राखण्यासाठी त्या त्या धर्मामताविषयी आत्मीयता दाखवावीच लागते. निधार्मिकतावादाचे प्रमुख उद्गाते पं. जवाहरलाल नेहरू समजले जातात, पण ते सुद्धा, सहाव्या जॉर्जच्या मृत्युनिमित्त दिल्लीतील ख्रिस्त्यांनी चर्चमध्ये बोलावलेल्या प्रार्थनेसाठी गेले. काँग्रेसच्या जयपुर अधिवेशन प्रसंगी ते पुष्कर तीर्थाच्या दर्शनासाठी न जाऊ शकले तरी तेथील दर्ग्यात मुसलमानी पद्धतीचा फेटादुपट्टा करून अवश्य गेले. बुद्धशिष्य सारीपुत्त मोग्गलान यांच्या अस्थीची पुनः प्रतिष्ठापना करण्यासाठी झालेल्या प्रचंड महोत्सवात नेहरू प्रभृतिसह अनेक निधार्मिकता बाबांनी उत्साहाने भाग घेतला होता. देशातील शेकडो सम्प्रदायांच्या विशेष उत्सवात निधार्मिक राज्याच्या अनेक अधिकाऱ्यांना अनिच्छेने का होईना पण भाग घ्यावाच लागतो. त्याच बरोबर आजकाल भगवान बुद्ध व त्याचे धर्मविचार या संबंधी डॉ. आंबेडकरांसारखे अनेक मोठमोठे पुढारी विशेष आत्मीयता दाखवीत असल्याने सर्वसामान्य सुशिक्षित व सुधारणावादी हिंदुसमाज बुद्धधर्माविषयी जिज्ञासू बनत आहे. वास्तविक बौद्ध सम्प् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , पुरुषार्थ , दीर्घा , श्री.भा. वर्णेकर

प्रतिक्रिया

  1. ugaonkar

      6 वर्षांपूर्वी

    मतमतांतरे



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts