अंक- मराठी ग्रंथसंग्राहक दिनकर विनायक काळे उर्फ बापूसाहेब काळे ( ३० ऑक्टोबर १८९८ ते १३ ऑगस्ट १९८०) हे लेखक, इतिहासाचे अभ्यासक तर होतेच, परंतु महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीचे ते एक मुख्य प्रवर्तकही होते. ‘इतिहासशास्त्र व तत्वज्ञान’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘मराठी नियतकालिकांची सूची’ खंड १ व २ आणि ‘काळे पाणी’ ही कादंबरी, हे आणि इतर असे भरपूर लेखन त्यांनी केले. १९३५ साली ते ‘सह्याद्री’ या मासिकाचे संपादक झाले. वृत्तपत्रांच्या कार्यालयांना संदर्भ आणि माहितीसाठी संपन्न ग्रंथालयांची कशी गरज आहे हे सांगणारा हा लेख त्यांनी सत्तर वर्षांपूर्वी लिहिला होता. अलिकडे संदर्भांसाठी ग्रंथांचा शोध घेणारे पत्रकार कमी झाले आहेत. गुगलच्या विद्वत्तेवर अवलंबून राहणारांची संख्या वाढते आहे. सार्वजनिक, सरकारी आणि खाजगी अशा तीन्ही प्रकारातील ग्रंथालयांना ओहोटी लागली असल्याचे एक पाहणीवजा वृत्तही अलीकडेच प्रसिद्ध झाले होते. त्या पार्श्वभूमीवर काळे यांनी ग्रंथालये, ग्रंथपाल यांविषयी सत्तर हा लेख उद्बोधक आहे. सत्तर वर्षात ग्रंथालय चळवळ फोफावली आणि संपलीसुद्धा. मराठी समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचा हा ढळढळीत पुरावाच म्हणता येईल- ********** ‘सह्याद्रि’ या मासिकाचे संपादक, केसरी मराठा ग्रंथ शाळेचे क्यूरेटर, मार्मिक लेखक व कुशल वादविवादपटु या नात्यांनी श्री. दि. वि. काळे हे महाराष्ट्रांत सर्वांना ज्ञात आहेत. मुंबई प्रांतिक सरकारने महाराष्ट्रांतील मराठी ग्रंथालयांच्या उत्कर्षासाठी जी “प्रादेशिक ग्रंथालय समिती” नेमली आहे तिचे श्री. काळे हे सन्माननीय कार्यवाह असून अशा अधिकारी लेखकाच्या लेखणींतून उतरलेला पुढील लेख ग्रंथालय शास्त्र जिज्ञासूंना मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे. *** सर्वसाधार ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
milindraj09
6 वर्षांपूर्वीया संबंधाने आपण काय करू शकतो याचा विचार करून तशी पाऊले उचलायला हवीत.