सत्यकथा- अखेरच्या घरघरीची वेदना


अंक – सत्यकथा, डिसेंबर १९७९ लेखाबद्दल थोडेसे : वाङ्मयीन गुणवत्तेचा दीपस्तंभ आणि पांढरपेशा ब्राम्हणी साहित्याचा प्रतिनिधी अशी दोन टोकाची भूषणे आणि दूषणे 'सत्यकथा' या मासिकाच्या वाट्याला आली. सत्यकथेच्या आयुष्याचे विविध टप्पे आहेत. मुळात १९३३ सालच्या नोव्हेंबर महिन्यात मो. ग. रांगणेकर यांच्या संपादकत्वाखाली ते सुरु केले द. शं. कुलकर्णी यांनी.  (रांगणेकर केवळ ३ महिने संपादक होते) फक्त खऱ्या आणि घडलेल्या गोष्टी सांगणे असा त्याचा हेतू होता. १९३६ साली द.पु. भागवत सत्यकथाचे संपादक झाले आणि त्यात राजकीय, सामाजिक लेख येऊ लागले. १९३८ ते ४२ या काळात अनंत अंतरकरांनी कार्यकारी संपादक म्हणून काम पाहताना मासिकाला साहित्यिक स्वरुप येऊ लागले. डिसेंबर १९४३ मध्ये विष्णुपंत भागवत संपादक झाले. रंजनाकडून ते हळूहळू नववाङ्मय, नवे प्रवाह,समीक्षा असे कलावादी स्वरुप सत्यकथेला आले. गंगाधार गाडगीळ, तेंडुलकर, एलकुंचवार, माधव आचवल, रत्नाकर मतकरी अशा लेखकांनी सत्यकथेला सर्वोच्च अभिरुचीचे मासिक असा लौकीक मिळवून दिला. मात्र या लौकीकानेच हळूहळू सत्यकथेचा खप मर्यादित होत गेला आणि अखेर ते चालवणे आर्थिकदृष्टया परवडेनासे झाले. सत्यकथा चालवणे अगदीच अशक्य झाले तेंव्हा, म्हणजे भागवतांकडे सुत्रे आल्यावर तब्बल ३६ वर्षांनी ही स्थिती आली तेंव्हा हे मासिक बंद करण्याआधीची अखेरची धडपड किंवा तगमग म्हणजे प्रस्तुतचा लेख आहे. तत्कालिन संपादक- प्रकाशक असलेल्या श्री. पु. भागवत यांनी सत्यकथेचा , डिसेंबर १९७९च्या अंकात तो लिहिला होता. या लेखानंतर साधारण तीन वर्षांनी म्हणजे सप्टेंबर १९८२ मध्ये सत्यकथा मराठी वाङ्मयीन इतिहासाचा भाग झाली. वाङ्मयीन मूल्य, नवे प्रवाह, अभिरुची यांबद्दल आस्था असूनही आपण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , श्री. पु. भागवत , सत्यकथा , पुनश्च

प्रतिक्रिया

  1. Aaidada

      6 वर्षांपूर्वी

    जगण्यासाठी वैचारिक/सामाजिक भान असणाऱ्या साहित्याची तेवढीच गरज आहे हा विचार च मागे पडला आहे त्यामुळे असं घडणे हे आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारल्या सारखे झाले आहे. महाराष्ट्रा बाहेर राहून आम्ही किती डोक्याला पोषक असं मिळवण्यासाठी धडपड करायचो ते आठवले. आजही दरवर्षी माझी दिवाळी अंक मिळवण्याची खटपट तशीच चालु आहे. बेंगलोर मध्ये अंतर ही मोठी समस्या आहे त्यामुळे मिळेल ते आधाशा सारखे वाचते मात्र एक खंत वाटते की दर्जेदार वाचायला मिळण्याची शक्यता कमी होत चालली आहे. मी बहुविध ची आभारी आहे की तुमच्या मुळे मला थोडे तरी काही चांगले वाचायला मिळते आहे ?

  2. VivekG

      6 वर्षांपूर्वी

    दोन वर्षांपूर्वी अंतर्नाद मासिक बंद पडले, तेव्हाही अशीच खेदाची भावना निर्माण झाली होती.

  3. purnanand

      6 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर आणि हृड्द्य लेख. कदाचित वाचकांनी सक्रीय पुढाकार घेतला असता तर काही आशादायी घडलेही असते. लेखकांवर वाण्ग्मयीन संस्कार करण्यात सत्यकथेचे मोठे योगदान आहे. अंतर्नाद मासिकाचेही असेच झाले. एक छान लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  4. kaustubhtamhankar

      6 वर्षांपूर्वी

    वाचून वाईट वाटले.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts