गोवा सत्याग्रहातली आजीबाईंची सत्यकथा


अंक: पुरुषार्थ जून १९५५ आजचा हा लेख म्हणजे मराठी स्त्रीच्या कणखरपणाचा, देशभक्तीचा आणि सामाजिक कर्तव्यबुद्धीचा हलवून टाकणारा आलेख आहे. या लेखाच्या लेखिका अंबिकाबाई दांडेकर  म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिक गो. नि. दांडेकर यांच्या मातोश्री. या लेखाची पार्श्वभूमी थोडी खोलात जाऊन सांगावी लागेल, त्याशिवाय यातील नावे आणि संदर्भ कळणार नाहीत. गोवा मुक्ती संग्रामाचा तो काळ होता आणि गोव्याचं पारतंत्र्य महाराष्ट्राला क्षणोक्षणी सलत होतं, महाराष्ट्रानं गोवा मुक्तीचा ध्यास घेतला होता. नॅशनल काँग्रेस गोवा समितीची बैठक पुण्यात पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या घरी  फेब्रुवारी १९५५ मध्ये झाली आणि त्यांनी गोव्यातील नियोजित सत्याग्रहाचं नेतृत्व करण्याचं  जाहीर केलं. मात्र शास्त्री तेंव्हा नुकतेच एका शस्त्रक्रियेतून बरे होत होते त्यामुळे आग्रहानं आणि हट्टानं या सत्याग्रहाची जबाबदारी शास्त्रींच्या पत्नी सुधाताई जोशी यांनी आपल्या शीरावर घेतली. सत्याग्रहाचा तपशील ठरवण्याची जबाबदारी नॅशनल गोवा काँग्रेसचे  प्रमुख पीटर अल्वारिस यांच्याकडे होती.  ६ एप्रिल १९५५ रोजी म्हापशात सुधाताईंच्या अध्यक्षतेखाली मेळावा घ्यायचे ठरले. पोर्तुगीज सरकार हा मेळावा आणि सत्याग्रह होऊ  देणार नाही याची खात्री असल्यानं सत्याग्रही कार्यकर्त्यांनी लपत छपत गोव्यात पोचायचे असे ठरले. या तरूण, मध्यमवयीन कार्यकर्त्यांसोबत त्या सत्याग्रहासाठी  उत्साहाने रवाना झाल्या अंबिकाबाई दांडेकर, तेंव्हा वय वर्षे सत्तर! सत्याग्रहासाठी त्या कशा गेल्या, वयाच्या सत्तरीत सत्याग्रहींवरील अत्याचाराला  त्या कशा सामोऱ्या गेल्या आणि महाराष्ट्रात परत आल्या...या घटनांचा हा अंबिकाबाईंनी स्वतःच लिहेलेला हा रोमांचकारी वृत्तांत एकाचवेळी गंभीर आह ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


पुरुषार्थ , पुनश्च , अनुभव कथन , अंबिकाबाई दांडेकर

प्रतिक्रिया

  1. आनंद शेटे-पाटील

      5 वर्षांपूर्वी

    खरंच, वाचून रक्त सळसळते. तेव्हाची पिढी खूप वेगळी होती. अन्यथा घरदारावर विस्तव आता कोणी नाही ठेवणार देशासाठी. मनापासून सलाम.

  2. ugaonkar

      6 वर्षांपूर्वी

    छान

  3. Vandana

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर आहे लेख!!मी महादेव शस्त्रिंकडे कामाला जायची अर्थात दोघेही खूप थकले होते.खूपच भावला लेख

  4. Sunanda

      6 वर्षांपूर्वी

    रसाळ, बाळबोध (चांगल्या अर्थाने) लेखन.

  5. ulhas

      6 वर्षांपूर्वी

    राष्ट्रप्रेमानी भारावलेल्या माणसांचा आमचा वारसा! आता आमचीच पुढली पिढी " भारत तेरे टुकडे टुकडे होगे "ची भाषा करताना बघून व त्यास प्रतिष्ठा देणारे महाभाग बघून शरम वाटते. आमची पिढी कमी पडली हेच खर.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts