जी.ए. कुलकर्णी हे मराठी साहित्यातलं एक गुढ. त्यांचं साहित्य आणि त्यांचं आयुष्य या दोन्हींवरही हा गुढाचा एक अभेद्य पडदा होता. तर जयवंत दळवी हे एकाचवेळी मिश्कील आणि कोकणातील विक्षिप्त व्यक्तिरेखा, माणसाच्या अतृप्त लैंगिक इच्छा यांनी भरलेल्या व्यक्तिरेखांमधून काहीसं भयकारी वातावरण निर्माण करणारे लेख. त्याचवेळी हाती विनोदाचा लाकडी हातोडा घेऊन ठोकणारे ठणठणपाळही. दोघांचीही प्रतिभा लोकविलक्षण. जीए आणि दळवी यांच्यात दीर्घकाळ पत्रव्यवहार होता आणि त्या पत्रांत भांडणे, वाद, शिव्या, अपशब्द (जे आपण नेहमी फुल्या फुल्यांमधून व्यक्त करतो) यांचा यथेच्छ वापर होता. जीए गेले तेंव्हा दळवींनी त्यांच्यावर लिहिलेला लेख मग केवळ लेख कसा असणार? तसा तो नाहीच. त्या लेखातून माणूस म्हणून जीए आरपार उभे राहातात आणि दळवीही. ते कधी दांभिक वाटतात, कधी खोटे, कधी खोटारडे तर कधी कुठल्याही सामान्य माणसाप्रमाणे वाहावत जाणारे. दळवींनी काहीही हातचं न राखता लिहिलेला (किंवा खरं तर बरंच हातचं राखून परंतु काय राखलेलं असावी याची पुरेशी कल्पना यावी असा) हा लेख आहे. एका प्रतिभावंताची दुसऱ्या प्रतिभावंताला श्रद्धांजली. एखादी जमलेली मैफल संपल्यावर भैरवीचे स्वर कानात रेंगाळत असताना केवळ गप्प राहून त्या मैफलीच्या आठवणीतच रहावे असे वाटते, तसे हा लेख वाचल्यानंतर होते. १० जुलै १९२३ हा जी. ए. कुलकर्णी यांचा जन्मदिन. (ते गेले ११ डिसेंबर १९८७ ला) १४ ऑगस्ट १९२५ हा जयवंत दळवी यांचा जन्मदिन. ( ते गेले १६ सप्टेंबर १९९४रोजी) असे जुलै-ऑगस्टचे निमित्त साधून जयवंत दळवी यांच्या जीएंवरील लिहिलेल्या या मृत्युलेखाची (‘ललित’फेब्रुवारी १९८८ ) ही पुनर्भेट. जीए! – एक विलक्षण माणूस! (मूळ शीर्षक) जी. ए. कुलकर ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Amol Nirban
3 वर्षांपूर्वीनिव्वळ अगाऊपणा असंच दळवींनी घेतलेल्या भूमिकेबद्दल म्हणता येईल. जीएंनी असंच वागावं असं वागू नये हा अट्टहास का असावा? समोरचा माणूस तुमच्या मुद्द्यांचा प्रतिवाद करायला हयात नाही याचंही भान नसावं?
Abhinav Benodekar
4 वर्षांपूर्वीदळविंचे लिखाण तसेही निर्विष आहे. लोक जादा भावनाप्रधान होऊन, निदान मृत्यूनंतर लगेच असे नको लिहवायला, म्हणतात. पण जी. ए.नंचा लेखक म्हणून मोठेपणा आणि व्यक्ती म्हणून गुंतागुंत छान मांडली आहे.
SubhashNaik
6 वर्षांपूर्वीजी एं चा बुरखा फाडण्याचे इच्छा जयवंत दळवी यांच्यातील 'ठणठणपाळा' ने या लेखात पुरेपूर पूर्ण करून घेतली आहे. जीएंच्या जवळच्या लोकांना व चाहत्यांना हे अजिबात रुचले नाही, असे ऐकिवात आहे. पण दळवींचा निर्विष लेखनाचा दबदबा मराठी साहित्य वर्तुळात असल्याने म्हणा की अन्य काही कारणाने कुणी त्याविषयी नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली नाही. जीएंच्या निधनानंतर हा लेख प्रसिद्ध झाल्याने त्यांचे आप्तजन मात्र दुखावले हे खरेच.
rakshedevendra
6 वर्षांपूर्वीया लेखात मला तरी काहिही वावगे वाटले नाही, विशेषतः जी ए आणि दळवी यांच्या संदर्भात.
rambhide
6 वर्षांपूर्वीजीए व दळवी, दोघांच्याही वैशिष्ठ्यांना साजेसा लेख! बाकी आपण बोल लावणारे कोण?
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीहा लेख पूर्वीही वाचला होता.. मृत्युलेख कसा नसावा याचे हे उदाहरण आहे. त्याकाळी देखील यावर टीका झाली होती. त्यांच्या कथांबाबत अवाक्षर नाही. मात्र त्यांच्या खाजगी गोष्टी चवाठ्यावर आणल्या. जी.एं.च्या “विक्षिप्तपणाचे” असे प्रदर्शन करण्याची ती वेळ नव्हती. जी.एं.च्या “विक्षिप्तपणाच्या” कथा नंतरही यथासांग चघळल्या गेल्या.. त्या गोष्टी वाचून मलाही नवल वाटायचे.. व्यक्ती आणि त्याचे लेखन ह्या गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात असे मला वाटते. शिवाय गॉसिप कडे दुर्लक्ष करणेच योग्य. काही वर्षांपूर्वी जी.एं. ची मावसबहीण नंदा पैठणकर यांचे “प्रिय बाबूअण्णा” हे पुस्तक वाचनात आले. जी.एं.च्या व्यक्तिमत्त्वाचे वेधक चित्रण केले आहे. हे पुस्तक वाचल्यावर जी.एं.च्या “विक्षिप्तपणाच्या” मागील त्यांची भूमिका लक्षात आली. दळवींनी लिहिलेला हा मृत्युलेख पुन्हा वाचताना लक्षात आले की दळवींना जी.ए. खरंच कळले नव्हते. लेखाचे शीर्षक “ जी.ए.: न कळलेले” असे हवे होते. त्यांची घनिष्ट मैत्री होती. पण जी.ए.यांच्या मानसिकतेचे आकलन दळवींना झाले नाही..