चिरतरुण पुस्तके भाग २

पुनश्च    किरण भिडे    2017-09-27 07:42:59   

गोपाळ गणेश आगरकर यांनी लोकमान्य टिळकांबरोबर झालेल्या तात्विक मतभेदांनंतर १८८८ साली स्वतःचे 'सुधारक' हे साप्ताहिक सुरू केले. सुधारकमधील इंग्रजी मजकूर गोपाळ कृष्ण गोखले लिहित असत. स्वातंत्र्य आधी हवे की समाजसुधारणा ? या वादात त्यांचा पक्ष समाजसुधारणांच्या बाजूने उतरला आणि त्यांनी टिळकांच्या पक्षाविरुद्ध तेव्हढ्याच तडफेने लेखणी चालवली. बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या निमित्ताने या दोन्ही पक्षातील वैचारिक तुंबळ युद्धाचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राने त्यावेळी घेतला. प्रस्तुत पुस्तकात आगरकरांच्या मृत्यूपर्यंत ७ वर्षं म्हणजे १८९५ सालापर्यंत त्यांनी सुधारकच्या संपादकपदी असताना जे लेखन केले त्यातले निवडक साहित्य घेतले आहे. दीर्घ प्रस्तावना ग. प्र. प्रधानांची आहे तीदेखील वाचण्यासारखी आहे. पुस्तकाचे प्रकाशन साहित्य अकादमीने केले आहे. -  संकलन Google Key Words- Gopal Ganesh Agarkar, Saptahik Sudharak, G.P. Pradhan, Sahitya  Academy Publication ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


पुस्तक परिचय , मुक्तस्त्रोत , मराठी नियतकालिके

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts