२६ सप्टेंबरची ग्रंथसखा भेट

पुनश्च    किरण भिडे    2017-09-27 17:23:34   

कालचा पूर्ण दिवस बदलापूरच्या ग्रंथसखा वाचनालयात गेला. पुनश्चच्या फेसबुक पेजवर कालच्या दिवसभरात काहीच पोस्ट का टाकल्या नाहीत याची विचारणा झाली तेव्हा भरून पावलो. म्हटलं म्हणजे आपण उगाच bombarding  करीत नाहीयोत लोकांना. त्यामुळे आज याच ट्रीपबद्दल छोटी पोस्ट. जाणवलेल्या दोनच गोष्टी... पहिली गोष्ट : श्याम जोशी सर फार मोठं काम करीत आहेत. राज्यकर्त्यांना आणि जनतेला दोघांनाही त्याची जाणीव नाहीये तरीही ते त्यांची लढाई 'की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने..' असं म्हणत लढत आहेत. पैसा महत्वाचा असतो असं जगात म्हटलं जातं ते विधान १००% पटतं. फक्त अजून एक विधान केलं जातं की चांगल्या कामांना पैशाची कमतरता भासत नाही. हे विधान पण १००% सत्य ठरो. दुसरी गोष्ट: काय मागाल ते त्यांच्याकडे मिळतंच. काल मी ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकरांचे "माझे बारा वर्षांचे काम" मागितलं तर लगेच काढून दिलं. भितभीतच विचारलं की, केतकरांच्या बायकोने लिहिलेलं पण एक पुस्तक आहे ना? लगेच समोर "मीच हे सांगितले पाहिजे" हजर. अशी दुर्मिळ पुस्तकं जमवायला नुसते पैसे पुरेसे नाहीत, एक व्हिजन पाहिजे ते करायला. आणि ती सरांकडे आहे. सर आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा Google Key Word - Granthasakha Library ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , मुक्तस्त्रोत , पुनश्च उपक्रम

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts