मी ‘कैद केलेले कळप’ ही कादंबरी का लिहिली?

पुनश्च    अरुण गद्रे    2019-08-02 10:00:59   

लेखाबद्दल थोडेसे-

अंक: मनोविकास प्रकाशन दीपावली विशेषांक २०१५ लेखक, कादंबरीकार आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरुण गद्रे यांचा वैद्यकीय प्रवास वेगळ्या सामाजिक जाणिवेनं होत गेला. किनवट, लासलगाव यांसारख्या भागात कुठल्याही वैद्यकीय सेवेची उपलब्धता नसताना, असंख्य अडचणी आणि आव्हानांना सामोरं जात डॉक्टरांनी अनेक वर्षं आरोग्यसेवा पुरवण्याचं काम केलं आणि या सगळ्या अनुभवातून लेखनही केलं. गेल्या काही वर्षांत एका समाजसेवी संस्थेत ते काम करत होते. तिथल्या अनुभवांवर आधारित कादंबरी त्यांनी लिहिली - ‘कैद केलेले कळप.’ एका अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या बुद्धिमान तरीही संवेदनशील आणि सामाजिक जाणिवेनं काम करणार्‍या सृजनशील लेखकाच्या लेखणीतून उतरलेली ही नवी कादंबरी लिहिली गेली तरी कशी, याचा स्वत: लेखकानं घेतलेला वेध.

लेख-

आज जेव्हा मी या प्रश्‍नाचा विचार करतोय, की ‘कैद केलेले कळप’ ही कादंबरी मी का लिहिली, तेव्हा मुळात, मी लिहितोच का, या प्रश्‍नाचं उत्तर शोधणं मला आवश्यक आहे. याचं उत्तर माझ्याजवळ आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी दिवाळीची आणि मे महिन्यातल्या सुट्टीची मी वाट बघत असायचो आणि सुट्टीत जर मुंबईला बहिणीकडे जायचं ठरलं, तर मुंबईचं अजून एका कारणामुळे मला आकर्षण असायचं - मला मुंबई भेटीत विजय तेंडुलकर यांना भेटता येत असे. ते होते माझ्या ‘एक होता फेगाड्या’ या कादंबरीचे फॅन. त्यांनीच ते मला सांगितलं होतं. त्यांचं तशा अर्थाचं एक पत्र म्हणजे आजही माझा एक मौल्यवान ठेवा आहे. एकदा त्यांच्याशी बोलताना हा विषय निघाला होता, की मी का लिहितो? कादंबरी का? ‘फेगाड्या’ लिहिताना माझ्याकडे महिन्याला पन्नास डिलिव्हरी होत होत्या. अन् पहाटे तीन वाजता उठून मी ती कादंबरी झपाटल्यासारखी लिहिली...

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्य , दीर्घा , अनुभव कथन , मनोविकास प्रकाशन , साहित्य रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. Sandhya Limaye

      6 वर्षांपूर्वी

    2015 साली

  2. atmaram-jagdale

      6 वर्षांपूर्वी

    ही कादंबरी केव्हा प्रसिद्ध झाली ?

  3. atmaram-jagdale

      6 वर्षांपूर्वी

    लेख आवडला . खूपच नवीन आणि माहित नसलेली माहिती देणारा असा वाटला .अशा जगापासून आपण खूपच दूर असतो . अशा अभ्यासू लेखकांमूळे नवे नवे विषय आशय समजत जातात . आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत जातात . छान लेख आहे आवडला .

  4. amarsukruta

      6 वर्षांपूर्वी

    कैद केलेले कळप वाचायलाच पाहिजे

  5. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    ते डॉ अरुण लिमये...

  6. ugaonkar

      6 वर्षांपूर्वी

    हे अरुण गद्रे म्हणजे cloroform वाले नाहीत.! विषय समजून घेणे पण कठिण आहे .



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts