'महालक्ष्मी एक्स्प्रेस' मधील थरार

पुनश्च    मंदार गावडे    2019-07-29 19:00:37   

" ब्रो , वेक अप , यु नीड टू सी दीस . पाणी अगदी दारापर्यंत आलंय . काही वेळात आतमध्ये येईल . " सकाळी आठच्या सुमारास रवीने उठवले .रात्रभर केलेल्या धावपळीमुळे आधीच अंगात त्राण उरले नव्हते . सकाळी साडेचारला डोळा लागला होता . त्यामुळे नाराजीनेच डोळे किलकिले करून त्याच्याकडे पाहिलं . त्याचा चेहरा चिंतातुर दिसत होता . वरच्या बर्थवरून खाली उतरलो आणि दारापाशी जाऊन बाजूला काय चाललंय ते पाहू लागलो . रविवारी हॉटेल सयाजी कोल्हापूरला अनिशचा साखरपुडा होता. शनिवार, रविवार सगळ्यांना सुट्टी असल्याने आम्ही मित्रांनी शुक्रवारी रात्रीच निघायचं ठरवलं होतं. शनिवारी मस्तपैकी तिथल्या एका मित्राची गाडी घेऊन एक दिवस कॉलेजला , होस्टेलला जायचं , जे जे जुने अड्डे होते तिकडे जाऊन जुन्या आठवणींची उजळणी करायची, हुंदडायचं असा बेत होता . ठरल्याप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधून तासभर लवकर निघालो . पॅकिंग केलं . एव्हाना पावसाची रिपरिप चालू झाली होती . रिक्षासाठी मारामार होती , कशीबशी रिक्षा पकडून मुलुंड स्टेशन गाठलं . मध्येच ट्राफिक लागल्याने रिक्षा वाटेत सोडून चालत आलो . तोवर वाऱ्यापावसामुळे कंबरेखाली चिंब भिजलो होतो . स्टेशनला येऊन पाहतो तर काय , प्लॅटफॉर्मवर माणसांचा पूर आला होता . पण एकच स्टेशन जायचं असल्याने धक्काबुक्की करत कसाबसा घुसलो . दरवाज्याजवळच उभा असल्याने एक बाजू एव्हाना पूर्ण भिजली होती. शुद्धोदक स्नानम समर्पयामि म्हणत ठाणे स्टेशन गाठलं. पावसाला दोन चार शिव्या हासडत स्टेशनवर तसवीरला हुडकलं. एव्हाना रवी , दुबे आणि गुज्जू दादरहून महालक्ष्मीने निघाले होते . ठाण्याला नऊची वेळ होती . मात्र गाडी अर्धा तास लेट झाली . मागाहून निघणाऱ्या चेन्नई एक्सप्रेसला पुढे सोडण्यात आलं होतं . झाल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रासंगिक , अनुभव कथन , व्हिडीओ , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. rambhide

      5 वर्षांपूर्वी

    दोनच किमीवर स्टेशन होते तर गाडी हळू हळू चालवीत का आणली नाही असा प्रश्ण अनेकांना पडला असेल. अशा पावसात व वाहत्या पाण्यात रुळांखालची खडी पूर्णपणे वाहून गेलेली असू शकते व नुसतेच रूळ स्लिपरसह हवेत लटकत असू शकतात. या कारणास्तव पायाखालची जमीन सरकेल असा निर्णय घेत नाहीत.

  2. amarsukruta

      5 वर्षांपूर्वी

    छान

  3. ShaileshN

      5 वर्षांपूर्वी

    खरोखरीचं वातावरण उभे केलेत. परवा टेलिव्हिजनवर दाखवण्यात आलं त्यापेक्षा खूपच वेगळं होते हे वास्तव. - शैलेश पुरोहित



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts