‘जागो ग्राहक जागो’ ने ग्राहकांमध्ये बऱ्यापैकी जाग आणली. बाजारातून वस्तू आणताना तिचे मूल्य, quality वगैरेंबाबत लोक आता जागृत असतात. हे केवळ उत्पादनच नाही तर देऊ केलेल्या सेवांबद्दलही असल्यामुळे लोक आपण मोजलेल्या किंमतीयोग्य ती वस्तू वा सेवा आहे की नाही ते पाहतात आणि ते पाहणे आवश्यकच आहे. मात्र काही वेळा, विशेषतः सेवांच्या बाबतीत जिथे ती देणारा माणूस आहे हे अभिप्रेत असते तेव्हा ग्राहक राजाने थोडे तारतम्याने ‘राजा’ बनणे आवश्यक असते. तुम्ही एखाद्या टुरिस्ट कंपनीबरोबर सहलीला निघाले आहात, अर्थातच तुम्ही आनंदासाठी जाणार असता, मूडही छान असतो. त्यासाठी तुम्ही भरपूर पैसेही मोजलेले असतात. मात्र तिकडे गेल्यानंतर अत्यंत अनपेक्षितपणे हवामानामुळे म्हणा, तिकडच्या काही स्थानिक राजकीय कारणांमुळे म्हणा, किंवा इतर काही अपवादात्मक प्रसंग ओढवल्यामुळे म्हणा, तुमची ठरलेली स्थळे पाहून होत नाहीत. जर ती कंपनी म्हणजे टूर लीडर त्याच्याकडून शक्य ते प्रयत्न करताना दिसत असेल तर “आम्ही पैसे मोजलेयत” असं म्हणत भांडत राहण्यात काय हशील असतं? हॉस्पिटलमधल्या सेवांबद्दल आपण आग्रही असतो कारण तेव्हा प्रश्न आपल्या पेशंटचा, त्याला जास्तीजास्त आराम कसा वाटेल याचा असतो. सध्या सगळीकडेच डॉक्टर पेशंट हे नाते ताणले गेले आहे, दोन्ही बाजूंनी परस्पर विश्वास कमी झाला आहे. हॉस्पिटल्स, डॉक्टर्स त्यांचा व्यवसाय, आणि त्याला अनेक ठिकाणी आलेले धंद्याचे स्वरूप हा एक स्वतंत्र विषय आहे. इथे वैद्यकीय व्यवसायात आपल्याला सेवा देणाऱ्या नर्स, तिथल्या मावशा, मामा यांच्या सेवेबद्दल मला बोलायचे आहे. हॉस्पिटलमध्ये आपले कोणी admit असेल तर आपला सर्वात जास्त संबंध या मंडळींशी येतो. इथे अनेकदा पेशंटच्या नातेवाईक मंडळींची वागणू ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीछान . विषय महत्त्वाचा आहे. प्रत्येकजण समजूतदारपणे वागला, तर अनेक निरर्थक वाद कमी होतील..