मदत पोहोचविण्याचे आव्हान - महाराष्ट्र टाईम्स


महापुराचे संकट दिवसेंदिवस अक्राळविक्राळ बनत असताना सरकारी यंत्रणेच्या मर्यादा ठळकपणे समोर येत आहेत आणि त्याचबरोबर पूरग्रस्तांचा आक्रोश आणि संताप वाढत आहे. आभाळच फाटले आहे, तिथे ठिगळ कुठे आणि कसे लावणार, अशी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील परिस्थिती आहे. घरात घुसलेल्या संकटाशी लोक आपापल्या परीने सामना करीत आहेत. स्थानिक प्रशासन, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते आपापल्या यंत्रणा घेऊन मदत करीत आहेत. अवतीभवती आपल्यासाठी लढणारी, झुंजणारी माणसे पाहून संकटग्रस्त माणसांचे नीतिधैर्य वाढत असते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील लोकही गेले आठवडाभर धैर्याने अस्मानी संकटाचा सामना करीत आहेत. परंतु सरकारी यंत्रणेने राज्यपातळीवरून ज्या तातडीने, आत्मीयतेने मदत करायला पाहिजे होती ती केल्याचे चित्र दिसले नाही. त्यामुळेच, हा असंतोष आहे. त्यातूनच २००५च्या महापुराच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावलेल्या नेत्यांच्या आठवणी लोक काढत आहेत. एकीकडे सरकारी मर्यादा समोर येत असतानाच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा पूरपर्यटनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली. एकीकडे शेकडो लोक मरणाच्या दाढेत असताना मंत्री हसत फोटो काढत आहेत, हे चित्र संतापजनक आहे. आधीच निष्क्रिय असलेल्या सरकारकडे अशा आभाळ कोसळण्याच्या प्रसंगात पुरेसे गांभीर्य नसल्याचे त्यामुळे समोर आले. कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री असताना नियोजनासाठी त्यांच्यासोबत अधिक कार्यक्षम तरुण मंत्री पाठवायला हवे होते. परंतु आमदार फोडाफोडीत प्रवीण अशा गिरीश महाजनांना पाठवून मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचे गांभीर्य कमी केले. राज्य सरकारची य ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , महाराष्ट्र टाईम्स , निवडक अग्रलेख , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts