निवडक अग्रलेख - १७ ऑगस्ट २०१९ नावात साम्य असलं तरी बेळगाव तरुण भारत हा अजिबात संघ परिवाराचा भाग नाही. किरण ठाकूरांचा तरुण भारत मुख्यत्वे बेळगावात मराठीचा झेंडा उचलून धरणारा आणि सीमाप्रश्नावर आक्रमक असलेला पेपर आहे. पण आजचा पंतप्रधानांच्या भाषणावरचा अग्रलेख वाचताना नागपूर तरुण भारत वाचतोय की काय असा भास झाला. :) मग नागपूर तरुण भारत तर संघाचं मुखपत्रच समजलं जातं. त्यामुळे त्यांचा अग्रलेख मोदी स्तुतीने भरलेला असल्यास त्यात नवल ते काय ? मटाचा अग्रलेखही सीडीएस, म्हणजे तीनही सैन्यदलांचा मिळून एक सर्वोच्च अधिकारी नेमणे, या विषयावर असून त्याची तीव्र आवश्यकता आणि निर्णयाचे स्वागत करणारा आहे. दिव्य मराठीचा ४०० शब्दांचा अग्रलेख चक्कं 'सेक्रेड गेम्स' या अनुराग कश्यप च्या वेब सिरीज वर आधारलेला आहे. या सिरीजचे संवादांसह वर्णन आणि विश्लेषण त्यात केलं आहे. सध्याच्या राजकारणाशी जोडलेले सिरीजचे संदर्भ वाचून अक्षरशः हसू येतं. त्यामुळे तो अग्रलेखापेक्षाही, एखाद्या पत्रकाराची फेसबुक पोस्ट अधिक वाटतो. पण असो. लोकमत - काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीर भेटीसाठी दिलेले आमंत्रण; या भेटीमुळे होवू शकणारे सकारात्मक परिणाम हा एक भाग. आणि राजस्थानमधून मनमोहन सिंग हे राज्यसभेत पुन्हा निवडून जात आहेत; सध्याच्या आर्थिक तणावांच्या काळात सिंग संसदेत पुन्हा येण्याचे महत्व कसे असेल, हा दुसरा भाग अग्रलेखात विषद केला आहे. या दोन महत्वाच्या घटनांचे स्वागत करणारा लोकमतचा अग्रलेख सुंदर जमला आहे. तिहेरी तलाक बंदी, ३७० चे उच्चाटन, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करण्यासाठी मोदींनी ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .

                                
                                    

















		
                
                
सुधन्वा कुलकर्णी
7 वर्षांपूर्वीप्रतिक्रियेसाठी धन्यवाद... महेश खरे :) इतर अग्रलेखांच्या लिंक नक्की देता येतील. पण त्यात 'आजचा निवडक अग्रलेख ' हे विशेष शिल्लक रहात नाही. म्हणून केवळ त्या त्या अग्रलेखाची लिंक आपण देत असतो. अर्थात वाचकांची अधिक मागणी असल्यास त्याही देऊ.
MaheshKhare
7 वर्षांपूर्वीचांगला अग्रलेख आणि अग्रलेखांचा परिचय करून देण्याचा चांगला उपक्रम ! इतर अग्रलेखांच्याही लिंक्स मिळतील का ?