निवडक अग्रलेख - १९ ऑगस्ट २०१९ 'भूत नावाच्या अनाकलनीय भीतीने माणूस अकारण भयभीत झालेला असतो. त्यापेक्षा ३७० व ३५ अ नावाचा बागुलबुवा किंचितही वेगळा नव्हता' असं लिहून ३७० नंतर काश्मीरमध्ये असलेल्या शांततेवर भाष्य करणारा दैनिक पुढारीचा आजचा अग्रलेख चांगला आहे. नागपूर तरुण भारत- इम्रान खान यांची पाकिस्तानात आणि आंतरराष्ट्रीय समुदायात वाईट स्थिती कशी आहे याचं वर्णन करणारा आजचा अग्रलेख ठाकठीक. "चीनच्या नेत्यांनी भारतात येऊन झोपाळ्यावर बसून कितीही झोके घेतले तरी त्यांच्याकडून भारतासाठी, 'दिवस तुझे हे फुलायचे' असे शब्द कधीही येणार नाहीत, याची जाणीव असलेली बरी. " असे वेधक वाक्य लिहिणारा मटाचा अग्रलेखही चीनची याप्रश्नी लुडबुड दाखवणारा आहे. बेळगाव तरुण भारतने सुद्धा 'पाकिस्तानचा मुखभंग' या शीर्षकाखाली हाच विषय निवडून चिकित्सा केली आहे. युनो मध्ये या निमित्ताने झालेले राजकारण आणि विविध देशांचे प्रतिसाद यात वाचायला मिळाले. दिव्य मराठी थोर वर्तमानपत्र आहे. त्यांच्या अग्रलेखाला सोमवारी चक्कं सुट्टी असते. लोकमत च्या अग्रलेखाचाही विषय हाच आहे. जोडीला, चीनचे विस्तारवादी धोरण आणि त्यांच्यापासून भारताने बाळगायची सावधगिरी यासंबंधी अग्रलेख भाष्य करतोय. सामनाचाही अग्रलेख याच विषयावर. अर्थात नेहमीच्या आक्रमक शैलीत. तो लिहित असताना संपादकांना कायम हे भान असते की हा लेख मुख्यत्वे शिवसैनिक वाचणार आहेत. शिवसैनिकांना जी भाषा कळते आणि पटते, त्याच भाषेत सामना चे अग्रलेख असणे त्यामुळेच स्वाभाविक आहे. 'स्वातंत्र्य-कल्पनेचे कलेसंदर्भात चिंतन' अशा जड विषय ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
निवडक अग्रलेख
, सकाळ
, क्रिडा
, मुक्तस्त्रोत