इतिहासाकडे भक्तीभावाने अथवा कोणत्याही प्रकारच्या एकांगी नजरेने न पाहता तारतम्याने पाहिले, तरच खरा इतिहास उलगडतो आणि अनेक घटनांचे सामाजिक,राजकीय संदर्भ इतिहासकाराच्या हाती लागतात. अलिकडेच दिवंगत झालेले ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक जे.व्ही. नाईक हे अशाच इतिहासकारांपैकी होते. महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय वैचारिक नेतृत्वाची व्यापक दृष्टी आणि इतिहास यावर इंग्रजीत लिखाण करुन नाईक यांनी तो ठराविक वर्तुळाच्या बाहेर पोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला एवढेच आपल्याला माहिती असते. तो सुरु केला तेंव्हाची ब्रिटिशांची प्रतिक्रिया काय होती, टिळकांनी कसे हुषारीने ब्रिटिशांना कात्रीत पकडले होते याचे या लेखात अतिशय प्रभावी वर्णन केलेले आहे. मूळ इंग्रजी लेखाचे मराठी भाषांतर विकास परांजपे यांनी केले आहे. ********** सार्वजनिक गणेशोत्सवः ब्रिटिशांचा दृष्टीकोन ब्रिटिश सरकार ज्या नजरेतून लोकमान्यांकडे बघत असे तशाच नजरेने त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवांची दखल घेतली. ‘हे उत्सव एका बाजूने ब्राह्मणी वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी व दुसऱ्या बाजूने मुस्लिमविरोधी, सनातनी आणि सरकारविरोधी उचललेले पाऊल आहे.’ असा स्पष्ट आरोप प्रथमतः व्हॅलेंटाइन चिरोलने आपल्या ‘टाइम्स’मधल्या लेखांतून केला. चिरोलचे मत हे एक प्रकारे सरकारच्या टिळकांविषयीच्या गोपनीय कागदपत्रांचेच जाहीर रूप होते आणि मुख्य म्हणजे ‘फोडा व राज्य करा’ या इंग्रजांच्या नीतीला पूर्णपणे सोयीचा असाच हा दृष्टिकोन होता. १८९३ साली लोकमान्यांनी गणेशोत्सवाच्या या जुन्या परंपरेला सार्वजनिक स्वरूप दिले त्याला त्याच वेळी झालेल्या हिंदू-मुस्लिम दंग्यांची पार्श ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
adityalele55
6 वर्षांपूर्वीटिळकांनी चालू केलेला गणेशोत्सव म्हणजे संपूर्ण भारतीय / हिंदू समाजाला व्यक्तिनिष्ठतेपासून विचारनिष्ठतेपर्यंत घेऊन जाणारं एक महत्वाचं कारण ठरलं. महाराष्ट्रीय समाजात टिळक आणि डॉ . हेडगेवार यांसारखे लोकोत्तर नेते होऊन गेले ज्यांनी आपल्या हयातीतच नव्हे तर पश्चात सुद्धा समाजाला एका विचारसरणीत बांधून ठेवेल अशी अनुक्रमे सार्वजनिक गणेशोत्सव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपात साधने दिली. या साधनांच्या जोरावर त्यांच्या पश्चात सुद्धा हिंदू समाज टिकला आणि वाढला.