पडद्याआडच्या प्रचारात भाजपची सरशी! - दै. प्रहार


निवडक अग्रलेख - १९ ऑगस्ट २०१९ मटा - मोदी सरकारने जनतेला पाजलेली विकासाची अफू उतरायला लागल्यामुळे आर्थिक संकट जाणवू लागले आहे. विशेषतः वाहन क्षेत्रातल्या चिंताजनक मंदीचा उहापोह आजच्या अग्रलेखात मटाने केला आहे. तालिबान- अल कायदा - आयसीस या दहशतवादी संघटनांची थोडक्यात जन्मकथा, त्यांचा आयएसआय आणि पाकिस्तानशी असलेला संबंध, या सर्वांमुळे झालेली अफगणिस्तानची दुर्दशा, आणि त्यांचा काश्मिरवर होवू शकणारा परिणाम असा विस्तृत आलेख लोकसत्ताचा अग्रलेख वाचकांसमोर आज मांडतोय. 'तृष्णेकाठची वेदना' या सकाळच्या अग्रलेखात महापूर आणि कोरडा दुष्काळ हे एकाच वेळी भोगाव्या लागणाऱ्या अनुक्रमे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा- विदर्भ येथील शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. पण या समस्येवर नवीन पद्धतीचा तोडगा काढायला हवा असं सुचवणारा हा अग्रलेख, ती पद्धत कोणती याबद्दल काहीच सांगत नाही. 'उडाले ते कावळे, राहिले ते मावळे' ही मूळ शिवसेनेची घोषणा, हल्ली स्वतःच्या पक्षातील आउटगोइंग वर वापरणारे शरद पवार यांची खिल्ली उडवणारा सामना चा अग्रलेख धमाल आहे. आणि ... " २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीचं बिनशर्त पाठिंबा देत भाजपला सरकार बनवण्याचे आमंत्रण देणारे कावळे राष्ट्रवादीचेचं होते. हा चोंबडेपणा करण्याची तशी गरज नव्हती. राष्ट्रावादीच्या कावळ्यांनी तेव्हा ही फालतू काव काव केली नसती तर पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर वाहताना दिसले असते. " हे वाक्य इतकं सूचक आहे की त्याचे असंख्य अर्थ निघू शकतात. राजकारणाचे पदर जाणणाऱ्या वाचकासाठी हे खाद्य आहे. 'बेपर्वाईचे बळी ' हा दिव्य मराठी

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , दैनिक प्रहार , निवडक अग्रलेख , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts