सत्ताधारी पक्षाची ‘गरज’ -दै. पुढारी


निवडक अग्रलेख- दिनांक २३ ऑगस्ट २०१९ एखादे शीर्षक वाचले की लेखात काय असेल याचा अंदाज येतो. ' ज्याची लाठी त्याची ....' हे शीर्षक असलेला लोकसत्ताचा अग्रलेख, सीबीआय आणि ईडी, यांचा भाजप सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रच्छन्न गैरवापराचे वर्णन करतो. सोशल मिडीयाचा परिणाम अग्रलेखांवर कसा होतो हेही या लेखात बघायला मिळतंय. सदर लेखावर भाजप-भक्त काय काय आक्षेप घेतील ते नमूद करून अगोदरच त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न त्यात केला आहे. आणि हो, चिदंबरम हे (केवळ आरोपी असून) जोवर गुन्हेगार ठरलेले नाहीत, तोवर त्यांच्याबद्दल काहीही भले अथवा बुरे लिहिण्याची गरज नाही, असेही गिरीश कुबेरांनी नमूद करून टाकले आहे. त्यामुळे हा अग्रलेख वाचायला मजा येते. या पार्श्वभूमीवर प्रहारचा अग्रलेख जे घडले ते त्रयस्थपणे सांगतो आहे. चिदंबरम यांच्यावर आरोप न करता, त्यांच्या सर्व प्रकरणांचा थोडक्यात तपशील आणि भाजप सरकार / अमित शहा यांचे वचपा काढण्याचे धोरण या दोन्हीचा व्यवस्थित परामर्श घेतो. प्रत्येकाचे माप त्याच्या पदरात टाकणारा ' जे पेराल ते उगवते ' हा अग्रलेख अधिक संतुलित झाला आहे. सामनाचा अग्रलेख या विषयावरच. 'चिदंबरम यांचे अधःपतन' सांगताना त्यांनी स्वतः गृहमंत्री असताना याच प्रकारे केलेला सत्तेचा गैरवापर, घोटाळे यांची हा लेख आठवण करून देतो. ते सगळं ठीक, पण सामनाने उपस्थित केलेला एक प्रश्न जबरदस्त आहे. जामीन नाकारल्यावर गायब झालेले चिदंबरम ७२ तास दिल्लीतच होते. आणि पुन्हा स्वतः कॉंग्रेस मुख्यालयात प्रकट झाल्यावर सीबीआयला ते  दिसले. दरम्यान एवढ्या महत्वाच्या व्यक्तीला जर सीबीआय शोधू शकत नसेल तर गुन्हेगार आणि अतिरेक्यांना ते कसे शोधणार ?... एकद ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , निवडक अग्रलेख , पुढारी , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. सुधन्वा कुलकर्णी

      5 वर्षांपूर्वी

    धन्यवाद

  2. सुधन्वा कुलकर्णी

      5 वर्षांपूर्वी

    धन्यवाद

  3. shripad

      5 वर्षांपूर्वी

    सुधन्वा, हा एक छान आणि उपयुक्त उपक्रम आहे. आता बहुधा आम्ही दररोज सकाळी वर्तमानपत्र उघडण्याआधी या लेखाची वाट बघत जाऊ. ?

  4. vandananagargoje1970@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    खुप छान लिहिले आहे मी आपले नाव पाहिले किती लेख वाचणे, अभिनंदन

  5. सुधन्वा कुलकर्णी

      5 वर्षांपूर्वी

    धन्यवाद देवेंद्रजी!

  6. सुधन्वा कुलकर्णी

      5 वर्षांपूर्वी

    ' निवडक अग्रलेख ' हे जे शीर्षक आहे, त्यात आजचा सर्वोत्तम (वाटलेला) अग्रलेख असं अभिप्रेत आहे. म्हणून एकच लिंक दिली जाते. एकंदर अनुभव असा आहे की, लिंकवर क्लिक करून लेख वाचण्याकडे फार थोड्या वाचकांचा कल असतो. मात्र वाचकांचा आग्रह असल्यास सर्व अग्रलेखांच्या लिंक्स देता येतील. ते काही कठीण काम नाही.

  7. milindraj09

      5 वर्षांपूर्वी

    सगळ्याच अग्रलेखांची लिंक द्यावी म्हणजे आवडीप्रमाणे ज्याला त्याला वाचता येईल आणि आपली शिफारस पण करावी म्हणजे आमची भूक अधिक भागेल

  8. rakshedevendra

      5 वर्षांपूर्वी

    सुधन्वा, खूप धन्यवाद. साऱ्या अग्रलेखांचा समाचार असा एका लेखात समालोचन होत वाचता आला ही आज प्रभातसमयी मोठी उपलब्धी ठरली. उत्तम.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts