ऐ दिल है मुश्कील जीना यहां - मुंबई १९२०

पुनश्च    रा. भि. जोशी    2019-09-04 06:00:06   

रा. भि. जोशी हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक संयत प्रवृत्तीचे लेखक. शैलीचे अवडंबर नाही आणि आक्रमकतेचा लवलेश नाही. आस्वादक असा एक शांतरस त्यांच्या सर्व लेखनातून पाझरत राहतो. प्रवासवर्णनांना त्यांनी ललित साहित्याचे स्थान प्राप्त करुन दिले हे त्यांचे मोठे कर्तृत्व. जोशी मूळचे विदर्भातील.  ते विद्यार्थी असताना १९२०च्या सुमारास व्ही जे टी आय च्या परीक्षेसाठी मुंबईत आले होते. त्या पोरसवदा वयात त्यांनी विदर्भाच्या नजरेला झालेले मुंबईचे पहिले दर्शन ज्या प्रकारे टिपले होते, त्यावरुन त्यांच्या नकळत एक लेखक त्यांच्यात जन्माला आला होता, ले लक्षात येते. साठ वर्षांपूर्वीचा हा लेख वाचताना मुंबईने आणि एकूणच मराठी समाजाने एकमेकांबद्दलचा आपलेपणा, मदत करण्याची वृत्ती आणि निरागसता गमावलेली आहे असे वाटून थोडे उदासही वाटायला होते. या  लेखात तेंव्हाची मुंबई दिसते आणि तेंव्हाचा समाजही. ********** अंक – जनवाणी दीपावली विशेषांक १९६० मी मुंबईला जातो! मुंबईचा माझ्या मनावर ठसा राहिला तो तिथल्या अंधाराचा, तिथल्या दमटपणाचा.... ट्रामगाड्यांच्या खडखडाटाचा.... मुंबईला पुन्हा यावे असे काही वाटले नाही.... कायमचे तर नाहीच नाही. मी कधी काळी मुंबईला जाईन असे मला केव्हांच वाटले नव्हते. लहानपणी हैद्राबादला असतांना भविष्य सांगणाऱ्या एका गृहस्थाने माझ्या तोंडाकडे पाहून भाकित केले होते की, “हा मुलगा सोळा-सतराव्या वर्षी मुंबईला जाईल” ते त्याचे भाकित मी विसरलो नव्हतो. पण मी त्याला महत्त्वही दिले नव्हते. मी मुंबईला कशाला जाणार? आणि मला मुंबईला कोण पाठवणार? पण त्याचे ते भाकित माझ्या वयाच्या सतराव्या वर्षी खरे होत होते. मी मुंबईला चाललो होतो. मी मुंबईला चाललो हो ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , समाजकारण , अनुभव कथन , जनवाणी , स्थल विशेष

प्रतिक्रिया

  1. Rajendra Daga

      5 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख सहज सुंदर आधी विजेटीआय भायखला येथे होते ते ऐकले होते आता माटुंगा येथे तेथून मि पदवी घेतली

  2. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    sorry.. १९६३ साल नव्हे १८६३ सालची मुंबई..

  3. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    "मुंबईचे वर्णन"... यात १९६३ सालच्या मुंबईचे वर्णन आहे......

  4. asmitaphadke

      6 वर्षांपूर्वी

    छान लेख. यांची इतर पुस्तके कोणती आहेत ?

  5. rajakulkarni11@gmail.com

      6 वर्षांपूर्वी

    गोविंद नारायण मांडगावकर याचे कोणते पुस्तकं याच विषयावर आहे ते कळवा plz

  6. ArunBhandare

      6 वर्षांपूर्वी

    रा.भिंच्या वाटचाल,मजल दरमजल,अथवा,या संग्रहांची आठवण झाली.

  7. deepa_ajay

      6 वर्षांपूर्वी

    गोविंद नारायण माडगावकर यांचे अतिशय सुंदर पुस्तक ह्याच विषयावर आहे



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts