एक होता पोपट

पुनश्च    विलास पाटील    2017-10-18 06:00:58   

अंक - अंतर्नाद  माझ्या लहानपणी गोष्ट. असेन चौथी-पाचवीमध्ये. मिलमजुरांच्या चाळीत राहत होतो. शेजारी एक माळकरी युवा राहात होते. लोक त्यांना ‘ज्ञानेश्वर माऊली  ’ म्हणून संबोधायचे. कारण ‘ज्ञानेश्वरी माऊली’ हा जप नित्य त्यांच्या मुखात असायचा. समोरून कोणी ओळखीचा आला तर आपण ‘नमस्कार, रामराम’ असं म्हणून अभिवादन करतो. ते ‘ज्ञानेश्वर माऊली’ म्हणायचे. त्यांच्या अभिवादनाचा तो कोडवर्ड होता. लोकही ‘ज्ञानेश्वर माऊली’ म्हणून त्यांना प्रत्युत्तर द्यायचे. एकूणच त्यांची ‘माऊली’ म्हणून प्रसिद्धी होती. लोक त्यांना त्याच नावानं हाक मारायचे. त्यांना मूलबाळ नव्हतं. नवरा-बायको हाच त्यांचा परिवार. त्यामुळे त्या घरात माझा वावर होता. थोडेफार लाड होत. कोडकौतुक होई. ते मला सोबत कुठेकुठे घेऊन जायचे. कीर्तन, प्रवचन हे त्यांचे आवडीचे विषय होते. तिकडे तर मी जायचाच पण कधीकधी मित्रमंडळी, परिचित यांच्याकडेही मला घेऊन जाणं असायचं. ते हळूहळू डुलत चालायचे. मी त्यांचा हात धरून चालायचा. माझी धावपळ होण्याची शक्यता नव्हती. मी हौसेनं त्यांची सोबत करायचा. त्यामुळे मी घरीच असलो आणि त्यांनी ‘चल’ म्हणून हाक मारली की मी लगेच हजर. चारसहा घंटे कुठंकुठं फिरणं व्हायचं. कथा, कीर्तन कानावर पडायचं. मलाही ते आवडून जायचं. रविवारचा दिवस असावा. शाळेला सुटी होती. त्यांनी हाक मारली. कुठे, कशाला म्हणायचा प्रश्नच नव्हता. घरात आईला सांगून मी बाहेर पडलो. त्यांच्याबरोबर रस्ता चालायला लागलो. घरापासून मैलभर अंतरावर रामवाडी म्हणून वस्ती होती. तिथं त्यांच्या परिचिताकडे जायचं होतं. तासाभरात आम्ही तिथं पोहोचलो. ऊन झालं होतं. दुपारचे अकरा-बारा वाजलेले. त्यांच्या पडवीत आल्यावर बरं ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , कथा

प्रतिक्रिया

  1. Vilas Ranade

      4 वर्षांपूर्वी

    खूपच सुंदर आणि रंजक कथा आहे.पावकी,निमकी,इ.इ.आठवले.आपण काय शिकलो आणि पुढे काय झालो याचा काही नेम नसतो.घरातील वातावरण व परिस्थिती माणसाला कोणती तरी नोकरी करण्यास कारणीभूत होते,याचे यथार्थ उदाहरण कथेत आहे.

  2. किरण भिडे

      5 वर्षांपूर्वी

    आवडलेले लेख शेअर करताय ना? ज्यांना पाठवाल ते एक दिवसाचे सभासदत्व घेऊन वाचू शकतात.

  3. rajakulkarni11@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    छान च.... मस्त जमलीये... कुठेही वाचताना कंटाळा येत नाही... ओघवती भाषा.... आणि शेवटही अनपेक्षित....

  4. kiran.kshirsagar

      7 वर्षांपूर्वी

    अावडली!



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts