शंभर वर्षांपूर्वींचे चटकदार - तीर्थयात्रा वर्णन

पुनश्च    द. के. केळकर    2019-10-04 10:00:47   

अंक –वाङ्गमय शोभा, मे १९६६ नाशिकचे सरदार अण्णासाहेब विंचूरकर यांनी यथासांग तीर्थयात्रा पुऱ्या केल्या. त्यांची टांचणे, टिपणे बरोबरच्या मंडळींनी ठेवली होती. या साहित्याचा उपयोग करून नाशिक येथील त्यावेळचे विद्वान गणेशशास्त्री लेले यांनी तीर्थयात्रा प्रबंध हे प्रवासवर्णन लिहिले व १८८५ साली नाशिक येथेच छापून प्रसिद्ध केले. या दुर्मिळ ग्रंथाचे पुनर्मुद्रण, देशमुख आणि कंपनी, पुणे यांनी प्रसिद्ध केले आहे. त्याच्या आधारे हा लेख तयार केला आहे. शंभर-सवाशे वर्षांपूर्वी म्हणजे ज्या काळी प्रवासाची आगगाडीने बहाले केलेली आजची सुखसाधने ज्यावेळी उपलब्ध नव्हती त्याकाळी महाराष्ट्रांतील एक मातबर सरदार अण्णासाहेब विंचूरकर यांनी केलेल्या देशपर्यटनाच्या संबंधींची माहिती, त्यांच्याबरोबर यात्रेस गेलेल्या मंडळींनी टिपून ठेवलेला तीर्थयात्रेचा जमाखर्च व इतर संबंधीच्या माहितीच्या आधारे ‘तीर्थयात्रा प्रबंध’ नांवाचा ग्रंथ रसिकवर्य गणेशशास्त्री लेले यांनी लिहिलेला आहे. प्रस्तावनेंत शास्त्रीबुवा लिहितात की, “या ग्रंथात प्राधान्यें करून तीर्थयात्रांचे वर्णन आहे.  श्रीमंत रघुनाथराव हे पहिल्या प्रतीचे सरदार मोठे उदार. स्वधर्मनिष्ठ व सदाचारसंपन्न असून त्यांजजवळ इंग्रज सरकारीचीही मोठी मेहेरबानगी आहे. त्यांची राजनिष्ठा पाहून चक्रवर्ती महाराणीसाहेब ह्यांनी प्रसन्न होऊन संतोषाने त्यांस ‘कंपॅनियन ऑफ दी मोस्ट एक्झॉल्टेड ऑर्डर ऑफ दी स्टार ऑफ इंडिया’ हा किताब दिलेला आहे.” असा मोठा गौरवपर उल्लेख चरित्रकार करतात. उत्तर भारताच्या प्रवासानंतर कांही वर्षानी सरदारांनी दक्षिण भारतभर प्रवास केला तो आगगाडीने. उत्तर भारताचा प्रवास संपूर्ण केला तो इ.स. १८५१ मध्ये तर दुसऱ्या प्रवासास प्रारं ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , प्रवासवर्णन , दीर्घा , वाङ्मय-शोभा , स्थल विशेष

प्रतिक्रिया

  1. ghansham.kelkar

      6 वर्षांपूर्वी

    खुपच छान

  2. prashant1414joshi@gmail.com

      6 वर्षांपूर्वी

    हा पराक्रम वाचून, शेजवलकरांनी लिहिलेलं पानिपत पुस्तक आठवले ... ह्या सर्व धार्मिक विधीं मुळे चर्चिल साहेबांचे भविष्य मात्र खोटं ठरलं ...



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts