एखादा दिवस असाही येतो की दहा -बारा वर्तमानपत्रांतील एकही अग्रलेख विशेष भावत नाही. मग कोणता अग्रलेख निवडावा असा प्रश्न पडतो. अशावेळी जो अग्रलेख वाचकांना अधिक माहिती देणारा असेल, ज्ञान किंवा विचार बाजूला ठेवू, तो लेख निवडण्याकडे माझा कल असतो. कॉंग्रेसमधील समाजवादी असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते नगर जिल्ह्यातल्या संगमनेरचे आमदार, मंत्री बी. जे. खताळ-पाटील यांचे १०१ व्या वर्षी परवा निधन झालं. सुमारे २५ वर्षांची राजकीय कारकीर्द असलेल्या या नेत्याची नेटकी आणि सुयोग्य माहिती देणारा अग्रलेख तरुण भारत बेळगाव मध्ये आला आहे. राजकारणासारख्या बरबटलेल्या क्षेत्रात राहूनही, तीन वेळा हाती आलेले मुख्यमंत्रीपद नाकारून, वस्तुस्थितीला सामोरे जाणारे नेते फार विरळा पहायला मिळतात. खताळ-पाटील हे अशांपैकीचं एक म्हणावे लागतील. म्हणूनच नव्या पिढीला अशा नेत्याचा परिचय करून देणारा हा लेख मला माहितीपूर्ण वाटला. आजचा अग्रलेख तरुण भारत बेळगाव चा. https://bit.ly/2kGyf47 तरुण भारत बेळगाव, संपादक- जयवंत मंत्री *** आजचे अन्य अग्रलेख महाराष्ट्र टाईम्स - आघाडी झाली; युतीचे काय ? https://bit.ly/2mh7t2pसकाळ - तेलाचा दाह https://bit.ly/2kFrtvu
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
निवडक अग्रलेख , तरुण भारत बेळगाव
प्रतिक्रिया
निवडक अग्रलेख - १८ सप्टेंबर २०१९
पुनश्च
सुधन्वा कुलकर्णी
2019-09-18 09:15:28

वाचण्यासारखे अजून काही ...
sa
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च

पंडित मदनमोहन मालवियजींचे चरित्र - पूर्वार्ध
अज्ञात | 3 दिवसांपूर्वी
सक्तीशिवाय शिक्षण सार्वत्रिक करणें साधत नाहीं
देवमाणूस - उत्तरार्ध
गोपाळ गंगाधर पोतदार | 7 दिवसांपूर्वी
हा माणूस अप्रामाणिक असून स्वभावानें विश्वासघातकी आहे
देवमाणूस - पूर्वार्ध
गोपाळ गंगाधर पोतदार | 2 आठवड्या पूर्वी
त्यानें कपडे काढले आणि स्वैपाकघरांत स्टो पेटविण्याचा आवाज ऐकू आला
माझा एक अकारण वैरी - उत्तरार्ध
पु. ल. देशपांडे | 2 आठवड्या पूर्वी
आप्पा प्रधान अशा आवाजांत गर्जू लागला कीं, फळीवरचा रेडिओ ऐकू येईना.