महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार (५ ऑगस्ट १८९० ते ६ ऑक्टोबर १९७९) हे मराठीतील एक महत्त्वाचे इतिहास संशोधक. शास्त्रीय पद्धतीने इतिहास कसा लिहावा याबाबत त्यांनी ग्रंथही लिहिला होता. मराठ्यांचा इतिहास हा त्यांच्या संशोधनाचा, अभ्यासाचा प्रमुख विषय. इतिहासकार अभ्यास करताना त्या त्या काळातील घटनांची सत्यासत्यता पडताळण्याची साधने शोधतात त्याचवेळी काळाच्या ओघात झालेले बदलही किती आणि कसे सूक्ष्मपणे टिपतात याचा उत्तम नमूना म्हणजे प्रस्तुतचा लेख आहे. मुस्लिम शासकांचा आपल्या जगण्यावर, संस्कृतीवर पडलेला प्रभाव आणि ब्रिटिश शासकांचा प्रभाव यात खूपच फरक आहे. ब्रिटिशांनी बदल घडवून आणले ते जगण्याच्या शैलीत आणि विचार करण्याच्या पद्धतीत. ब्रिटिशांना कितीही शिव्या घातल्या तरी आपण आपल्या जगण्यात एकदा आलेला ‘ब्रिटिश’ कधीच घालवू शकलेलो नाही...हा लेख वाचला की ते पटेल. ********** अंक – अमृत, मे १९६५ ब्रिटिश राजवटीच्या आगमनापूर्वी महाराष्ट्रांतील समाजजीवन हे सर्वसामान्यपणे धार्मिक समजुती व जुन्या परंपरा यांच्यावर आधारलेल्या चालीरीतींनुसारच चाललें होतें. सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे सर्व जीवन अशा रीतीने केवळ पारंपारिक चालीरीतींवरच आधारलेले असे. समाज गतिमान असण्यापेक्षा गतिशून्यच जास्त होता. समाजांत बदल होत होते, नाही असें नाही. परंतु ते अतिशय सूक्ष्म आणि अप्रत्यक्षपणे घडून येत असत. ब्रिटिश लोक येण्यापूर्वी महाराष्ट्रांतील जुन्या चालीरीति आणि समारंभ वगैरेंमध्ये मुसलमानी राज्यकर्त्यांमुळे थोडासा बदल हा झाला होता याचे कारण हेंच. उदाहरणार्थ, खेड्यापाड्यामध्ये केवळ मुसलमानच नव्हे तर हिंदुदेखील मशिदींना पवित्र मानीत. पुढे ब्रिटिश राज्यकर्ते आल्यावर त्यांच्या राज्यसत्तेचाही स ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
harish.tamhankar@yahoo.in
6 वर्षांपूर्वीपोतदार यांचा लेख म्हणजे त्यात नवीन अभ्यासपूर्ण माहिती आणि विश्लेषण असणारच. आणि असा लेख वाचायला मिळणे म्हणजे आनंद.
drshaileshadhar@gmail.com
6 वर्षांपूर्वीछान वाटला लेख..पूर्वी चे लोकांचे राहणीमान चा ली रिती उत्सव या बद्दल ही वाचावयास मिळेल का,?
shripadjos@gmail.com
6 वर्षांपूर्वीसुंदर लेख
prithvithakur1
6 वर्षांपूर्वीसुंदर लेख!
bookworm
6 वर्षांपूर्वीकालाय तस्मै नमः!