अंक- अमृत, जानेवारी १९६५ (बहुविध डॉट कॉम मधील पुनश्च विभागातील हा लेख वाचा. व्यक्तिपरिचय सदरातील हा लेख अतिशय वाचकप्रिय आहे. पुनश्च विभागात याप्रमाणे इतर 26 सदरात ( अनुभवकथन, चिंतन, रसास्वाद इ. ) जुन्या नियतकालिकातील ( सत्यकथा, माणूस, किर्लोस्कर, दीपावली इ.) असेच छान छान लेख असतात. आजच रुपये २५० भरून पुनश्च चे वार्षिक सभासद व्हा आणि अशाच शेकडो लेखांचा आनंद लुटा. सभासद होण्यासाठी 02248972244 या क्रमांकावर miss call द्या. आम्ही आपल्याशी संपर्क साधू....) मल्ल, पैलवान म्हटले की आपल्याला हटकून कोल्हापूर आठवते. नागपूरचा कुस्तीशी काही संबंध आहे, असा विचार आपण स्वप्नातही करणार नाही. परंतु भोसल्यांच्या काळात नागपूरात मल्लविद्या चांगलीच फोफावलेली होती. त्यातही दया पैलवान लढणार म्हटलं की गाव गोळा होत असे. या दया पैलवानाची कथाही तेवढीच जबरदस्त आहे. ‘अमृत’मध्ये पंचावन्न वर्षांपूर्वी आलेला हा लेख नागपूरची एक वेगळीच बाजू दाखवतो.. नागपूर हे शहर एके काळी नागपूरकर राजे भोसले यांची राजधानी होते. तेथे त्यांनी मल्लविद्येला सर्वतोपरी पोषक परिस्थिती निर्माण करुन नागपूर हे मल्लांचे प्रमुख केंद्र केले. त्या काळी नागपूर हे भारतीय मल्लांच्या तोडीचे मल्लांचे आगर म्हणून प्रसिद्ध होते. ते नुसते मल्लांचे केंद्र म्हणूनच प्रसिद्ध होते असे नव्हे तर तेथील मल्लांचे एक आगळेच वैशिष्ट्य दाखवितां येण्यासारखे आहे. आमच्या इकडील मल्ल बुद्धीशी फारकत झालेला; ललितकलेचे त्याला वावडे असलेला; गायन, वादन, नृत्य यांची आवड नसलेला असतो. त्याला फक्त चोवीस तास आखाडा नि लाल माती, जोर बैठका आणि खुराक एवढ्याच गोष्टी ठाऊक. पण नागपूरकडील मल्लांचे तसे नाही. वेद, विद्या, संगीत, नाट्य, नृत् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
अमृत
, व्यक्ती विशेष
, क्रीडा
संजीव चिंबुलकर
6 वर्षांपूर्वीमस्तच