मैत्रिणींचे नवरे


या लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही फसला असाल याची गॅरेंटी आहे. 'मैत्रिणींचे नवरे' भेटल्यावर पुरुषांची काय स्थिती होते हा या लेखाचा विषय असावा असं वाटलं ना तुम्हाला? पण तसं मुळीच नाही. आपल्या मैत्रिणीचा नवरा भेटल्यावर, दुसऱ्या मैत्रिणीची अवस्था काय होते, नवरा हा विषय दोन मैत्रिणींमध्ये कसा अडचणी निर्माण करणारा ठरतो...अशा विषयावरला हा खमंग लेख आहे. आमच्या महिला सदस्यांना हि दिवाळीची भेट म्हणा हवं तर. परंतु पुरुष सदस्यांनीही आवर्जून वाचावाच, आपल्या बायकोची मैत्रिण आपल्याविषय़ी कसा विचार करते ते् जाणून घेण्यासाठी. विनोदी लेखांच्या मालिकेतील ही गोलाकार, काटेरी चकली! आणि लेख ६० वर्षांपूर्वीचा असला तरी आपण, बायका, त्यांच्या मैत्रिणी आणि त्यांचे नवरे अजूनही तस्सेच आहोत. अंक – आलमगीर, दिवाळी अंक १९५९  मैत्रिणींचे नवरे सामान्यतः तीन जातींचे असतात. कांही उपयुक्त असतात, कांही उपद्रवी असतात आणि इतर निरुपयोगी-निरुपद्रवी असतात. स्त्रियांच्या दृष्टिकोनांतून पाहतां मैत्रिणींच्या नवऱ्यांना टाळूं म्हणताही टाळतां येत नाही. कारण बहुतेकांना जीवनाच्या सहाऱ्यांत मैत्रिणी या ओयॅसिससारख्या आवश्यक भासतात आणि सहसा त्या नवऱ्यावाचून आढळत नाहीत. बाकी नवरा हाच खरा स्त्रीचा दागिना! स्वतःचा असा हक्काचा नवरा नसल्यास मैत्रिणींच्या या नवऱ्यांशी फार जपून वागणे इष्ट असते. याचे कारण तर कोणत्याही बाबतींत समतोल बुद्धीने वागणारी मैत्रीण, नवऱ्याची बाब येतांच बुद्धिभ्रंश झाल्यासारखी वागूं लागते. ती तुम्हांला आपल्या नव्या घरी येण्याचा पुन्हां पुन्हां आग्रह करील. मुद्दाम आपण होऊन स्वतःच्या नवऱ्याशी तुमचा परिचय करून देण्यास धडपडेल. तुम्हांला तो यदाकदाचित् सामान्य वाटेल, म्हणून त्याचे असाम ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , आलमगीर

प्रतिक्रिया

  1. amarsukruta

      6 वर्षांपूर्वी

    Vah mast

  2. Ashok Ghevade

      6 वर्षांपूर्वी

    खुपच छान आवडला



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts