गेला आठवडा मिश्र घडामोडींचा असल्याने अग्रलेखांचे विषयही मिश्र होते. आठवड्याची सुरुवात अजितदादा पवारांचे गायब होणे आणि दुसऱ्या दिवशी त्यांची पत्रकार परिषद या घटनेने गाजली. त्यामुळे बहुतेक अग्रलेखांचा विषय प्रामुख्याने तोच होता. पाठोपाठ गाजली ती कांद्यावरील निर्यातबंदी. निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारच्या या कृतीची कारणे, हेतू आणि परिणाम यांचा समाचार अग्रलेखांतून घेतला गेला. त्यानंतर भाजप -सेना यांची बहुप्रतिक्षित युती जाहीर झाली, आणि त्या बातमीच्या विश्लेषणाने अनेक अग्रलेख सजले. मग पाठोपाठ तिकीट वाटपातील नाराजी, विविध पक्षांत त्यामुळे उफाळलेली बंडखोरी हा रसभरीत विषय सालाबादाप्रमाणे चघळला गेला. याखेरीज भाजपसमोर शिवसेनेची झालेली दुरवस्था अत्यंत रोकड्या शब्दात मांडणारे लोकसत्ता आणि सकाळ यांचे अग्रलेख उत्तम होते. पुण्यात तीन तासांत झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे गेलेले १८ बळी यांची दखल सामना आणि तरुण भारत बेळगाव यांनी घेतली. यातले एक आश्चर्य म्हणजे पुण्यात सर्वाधिक खपणाऱ्या सकाळला हा विषय अग्रलेखासाठी घ्यावासा वाटला नाही. बहुदा या अगोदरच पेपरमधून बरंच लिहून आलं असल्याने, असे घडले असावे. न्यायमूर्ती ताहिलरामानी यांच्यावर झालेल्या कथित अन्यायावर अग्रलेख लिहिणाऱ्या वृत्तपत्रांनी त्यामागील सत्य बाहेर आल्यावर मौन बाळगलेले दिसले. एकट्या मुंबई तरुण भारतने मात्र त्यावर उत्तम अग्रलेख लिहिला आहे. असाच एकुलता एक अग्रलेख शनिवारी लोकसत्तात आला. ' जागतिक लोकानुनयवाद' या नव्याने येऊ घातलेल्या संकल्पेनेचा छान उहापोह त्यात केला आहे. कुठे आहे कॉंग्रेस पक्ष ? हाहा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
आठवड्याचा अग्रलेख , मुक्तस्त्रोत
प्रतिक्रिया
आठवड्याचा अग्रलेख- ७ ऑक्टोबर २०१९
पुनश्च
सुधन्वा कुलकर्णी
2019-10-07 10:00:18

वाचण्यासारखे अजून काही ...
sa
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च

पुरुषाला शेंदूर बचकाभर
म. वि. राजाध्यक्ष | 2 दिवसांपूर्वी
त्यांची सगळी मध्ययुगीन स्त्रीपूजा बिलकुल बेगडी होती.
सौदा
रणजित देसाई | 6 दिवसांपूर्वी
पन पाटील, हौसेन बाळगलेलं जनावर हाय. त्याला असंच जपा."
शहाजहानचा सुसंस्कृत पुत्र दारा शुको - भाग सहावा
रियासतकार गो. स. सरदेसाई | 2 आठवड्या पूर्वी
शिवाजी व दारा यांचा बुद्धीप्रभाव जगाच्या कल्याणार्थ एकवटू शकला नाहीं,
शहाजहानचा सुसंस्कृत पुत्र दारा शुको - भाग पाचवा
रियासतकार गो. स. सरदेसाई | 2 आठवड्या पूर्वी
नगरवासीयांनीं दाराबद्दल जो आक्रोश केला तो ऐकून औरंगजेबाचे पोटांत धस्स झालें.