रणांगण

पुनश्च    किरण भिडे    2017-10-19 16:15:39   

१९३९ साली आलेली ही 'रणांगण'ची पहिली आवृत्ती. गंमत बघाल तर लेखकाचं नावच दिसत नाहीये कुठेही. याच कादंबरीने विश्राम बेडेकरांना सर्वश्रेष्ठ कादंबरीकारांच्या यादीत नेऊन बसवलं.  मी अगदी अलीकडे हे पुस्तक वाचलं. अंतर्नाद मासिकाने काही वर्षांपूर्वी एक सर्वेक्षण केलं. त्यात मराठी साहित्यातील २० सर्वश्रेष्ठ पुस्तकं निवडली होती. त्यात हे पुस्तक होतं.  त्याच अंकात याआधी झालेली इतरांनी केलेली सर्वेक्षण पण होती. गंमत म्हणजे सर्व सर्वेक्षणात रणांगण सामायिक होतं. यामुळे माझी उत्सुकता वाढली. दुसरं महायुद्ध, त्यात जर्मनांनी ज्यूंवर केलेले अत्याचार यावर एवढं वाचन झालंय, चित्रपट बघितलेत की अजून काही बघा- वाचायचं बाकी असेल असं वाटत नव्हतं. त्यामुळे पुस्तक हातात आलं त्यावेळी 'काय आहे एव्हढं या पुस्तकात?' अशीच भावना मनात होती. पुस्तकाची पहिली काही पानं १९३९ सालचं मराठी, त्याचा टाईप, लिहिण्याची पद्धत याच्याशी जुळवून घेण्यात खर्ची पडली. पण एकदा ही कादंबरी जी तुमची पकड घेते ते शेवटपर्यंत तुम्ही पुस्तक खाली ठेवू इच्छित नाही. चक्रधर आणि हॅर्टाची ही असफल प्रेमकहाणी चुटपूट लावते. ज्यूंना नाझींनी किती क्रूर पद्धतीने मारलं ते मी याआधी वाचलं आणि सिनेमात बघितलं होतं. पण जे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


पुस्तक रसास्वाद , साहित्य रसास्वाद , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. अमर पेठे

      7 वर्षांपूर्वी

    धन्यवाद माहिती बद्दल. वाचायला पाहिजे रणांगण.

  2. kiran bhide

      7 वर्षांपूर्वी

    होय. ह. वि. मोटे प्रकाशक आहेत याचे.

  3. ashokacharekar

      7 वर्षांपूर्वी

    ya kadambarila marathi sahityatil mailacha dagad manle gele. veglya dhatnichi kadambari.

  4. natujaya

      7 वर्षांपूर्वी

    मालतीबाई बेडेकर तेंव्हा प्रस्थापित लेखिका होत्या .लेखनावर टीका करण्याऐवजी तुम्हीच उत्तम व सकस लेखन करून दाखवा असे त्यांनी विश्राम बेडेकरांना सांगितले .बेडेकरांनी ते आव्हानपाळले त्यातून “रणांगण”लिहिली गेली .बेडेकरांनी मुद्दामच त्यावर आपले नाव घातले नाही.मालतीबाईंच्या वाचनात हि कादंबरी आली .त्या प्रभावित झाल्या .चौकशीअंती त्याना कळलं कीं कादंबरी आपल्या पतीची आहे .माझ्या अंदाजाप्रमाणे हि पहिली आवृत्ती बेडेकरांचे साडू श्री .हरिभाऊ मोठे यांनी प्रकाशित केली असावी .



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts