राज्यात सध्या सत्तांतराचे वातावरण आहे. युतीच्या सरकारने सत्तेच्या पहिल्या चरणात म्हणजे १९९५ साली सुरु केलेली ब्राम्हण मुख्यमंत्री देण्याची परंपरा दुसऱ्या चरणात २०१४ साली पाळली आणि ती २०१९मध्येही पुढे सुरु राहण्याची शक्यता व्यक्त होत होती. परतुं राजकारणातील वळणवाटा एवढ्या सोप्या-सहज नसतात. १९९५ साली मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेंव्हा ब्राह्मण व्यक्ती या पदावर बसल्याचे निमित्त करुन किर्लोस्कर मासिकाने ‘जानव्याचा गुंता सुटला’ हा लेख प्रसिद्ध केला होता. तो पुनश्चच्या वाचकांनी यापूर्वीच वाचला आहे. त्यावर तेंव्हा भरपूर प्रतिक्रिया आल्या होत्या. सध्याच्या राजकीय वातावरणाचे निमित्त साधून त्यातील दोन निवडक प्रतिक्रिया- ज्या किर्लोस्करने प्रसिद्ध केल्या होत्या- त्या इथे देत आहोत, किर्लोस्करच्या संपादकांनी केलेल्या प्रस्तावनेसह. राज्याच्या राजकारणातील छुपे प्रवाह कळावेत एवढाच याचा हेतू आहे. ‘किर्लोस्कर’च्या ऑगस्ट ९५ अंकात ‘जानव्याचा गुंता सुटला’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. महाराष्ट्रात झालेले सत्तांतर आणि त्या निमित्ताने ब्राह्मणी मानसिकतेमधील गुंते यांची चर्चा लेखकाने केली होती. मनोहर जोशी ‘ब्राह्मण’ असूनही महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले, ही घटना देशाच्या दृष्टीने नसेल, लोकशाही राज्यप्रणालीच्या तत्त्वाच्या दृष्टीने नसेल, पण महाराष्ट्राच्या विशिष्ट अशा सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. राजकीय करिअरमध्ये ब्राह्मणपणा ही गुणवत्ता नसतेही, पण आडकाठीही नाही हे या घटनेने दाखवून दिले असे लेखकाचे प्रतिपादन होते. लेखकाचा दुसरा मुद्दा होता तो राखीव जागांच्या विषयाकडे ब्राह्मणांनी नव्या व्यापक भूमिकेतून बघण्याचा. बदलत्या परिस्थितीत ब्राह्मणांनी आपल ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
समाजकारण
, किर्लोस्कर
, पुनश्च
, बहुविध संकलन