वाह रे 'आरे'!

पुनश्च    संकलन    2019-11-09 06:00:15   

पाण्यापेक्षाही दूधाची उपलब्धता सहज झालेल्या आजच्या काळात महाराष्ट्रात एकेकाळी सकाळी सकाळी रांगा लावून दूधाच्या बाटल्या घ्याव्या लागत होत्या हे माहिती असण्याची शक्यता नाही. त्यातही चहावाले, उपाहारगृहे यांना दूधाच्या भूकटीऐवजी ताजे दूध वापरायचे असेल तर वेगळा परवाना घ्यावा लागत असे आणि तो सहजी मिळत नसे हे तर आज अशक्यप्रायच वाटते. गेल्या साठ-सत्तर वर्षात झालेल्या अनेक गोष्टींकडे कानाडोळा करताना अती परिचयात अवज्ञा होऊन अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते, दूधाची उपलब्धता ही त्यातली एक महत्वाची बाब आहे. आज आरे हा शब्द वेगळ्या कारणांनी चर्चेत असला तरी एकेकाळी आरे आणि दूध हे शब्द एकत्र उच्चारले जात होते. 'आरे'ने दूध गोळा करुन त्याचा मुंबई शहराला पुरवठा करण्याचा प्रकल्प १९५२साली सुरु केला तो देशातील धवलक्रांतीचा पहिला टप्पा होता. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आधी मुंबईच्या मंत्रिमंडळात दिनकरभाई देसाई हे कायदा व शिक्षण ही दोन खाती सांभाळत होते. परंतु दूध या विषयांचा त्यांचा अभ्यास होता त्यामुळे 'आरे'ची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. 'आरे' विषयी तेंव्हा त्यांची ही मुलाखत सह्याद्री साप्ताहिकात १९५३ साली प्रसिद्ध झाली होती. ती वाचताना आपण कुठून कुठे आलो ते लक्षात येते. सत्तर-ऐंशाच्या दशकात प्रसिद्ध असलेली 'वाह रे आरे' ही ओळ किती समर्पक होती तेही यातून स्पष्ट होते. मुंबई शहराचा दूधपुरवठा ( मूळ शीर्षक ) मुंबई शहराच्या दूधपुरवठ्याबद्दल अनेक साधकबाधक गोष्टींवर चर्चा चालू आहे. तींतून परस्पर विरुद्ध विधाने ऐकूं येतात. तेव्हा लोकांचे आरोग्य ज्यावर अवलंबून आहे अशा दुधाच्या पुरवठ्याचा जो अभिनव प्रयोग मुंबई शहरापुरताच चालू आहे त्याबद्दल ‘सह्याद्री’चे खास ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सह्याद्री , पुनश्च , बहुविध संकलन

प्रतिक्रिया

  1. arush

      6 वर्षांपूर्वी

    बाप रे किती इतिहास मोठा आहे दुधाचा

  2. amarsukruta

      6 वर्षांपूर्वी

    फारच रंजक. विकास होताना पर्यावरण ढासळते परंतु लाखोंची आयुष्येच कायमची बदलून जातात. हे सगळं माणसाच्या कर्तृत्वाची वाचताना कमाल वाटते!



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts