कुठल्याही लेखकाला, साहित्यिकाला, कवीला पैसा आणि प्रसिद्धी किंवा नाव यातलं काय हवं असं विचारलं तर उत्तर येतं नाव हवं. लोकांनी आपल्याला ओळखावं, आपली कला, लिखाण, ओळी नावानिशी गुणगुणल्या जाव्यात हे प्रत्येक शायर, कवीचं स्वप्न असतं. बर्यापैकी कवींचं ते पूर्ण सुद्धा होतं पण शायरीच्या नावावर लोकांनी त्यांच्या मुलांची नांव ठेवावीत हे जरा दुर्मिळ. अगदी एका हातावर मोजावेत असे लोक आहेत त्यांना हे भाग्य मिळत. पाकिस्तानातला असाच एक शायर, ज्याला 20व्या शतकाचा गालिब म्हटलं गेलं, तो स्वतःला मिळालेल्या या प्रेमाबद्दल, प्रसिद्धीबद्दल लिहितो, और 'फ़राज़' चाहिएँ कितनी मोहब्बतें तुझे माओं ने तेरे नाम पर बच्चों का नाम रख दिया अजून किती प्रसिद्धी हवी आहे? आता तर आयांनी त्यांच्या मुलांची नावं सुद्धा तुझ्या नावावरून ठेवलीत. अशी प्रसिद्धी किती जणांना मिळाली असेल? गालिब, ज्याच्या नावाशिवाय उर्दू शायरीचा उल्लेख होऊच शकत नाही त्याच्या नावावरून तरी किती मुलांची नावं ठेवली गेली असावीत? पण या 20व्या शतकातल्या गालिब वरून अनेक मुलांची नाव आहेत हे मात्र खरे. त्या शायरचं नाव आहे 'अहमद फराज'. सईद अहमद शाह अली या मूळ नावाच्या अहमद फराज यांचा जन्म 21 जानेवारी 1931 ला पाकिस्तानात कोहाटला झाला. ते वंशाने पठाण होते. त्यांची उंची, शैली किंवा एकूण राहण्याची पद्धत सुद्धा पठाणी होती. फाळणीच्या काळात कधीतरी हे शाह कुटुंब पेशावरला स्थायिक झालं ते कायमचंच. पुढे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पेशावरमध्येच पूर्ण केलं. उर्दू आणि फारसी या भाषांमधून एम.ए. केलं. काही काळ रेडिओत लेखक म्हणून नोकरी केली, नंतर काही काळ पत्रकारिता केली मग मात्र पेशावर विश्वविद्यालयात उर्दूचे प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागले. पाकिस्तानात ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Apjavkhedkar
5 वर्षांपूर्वीह्या नात्याची ओळख आपण करुन दिली. धन्यवाद.
prashant1414joshi@gmail.com
5 वर्षांपूर्वीवेगळ्या विषयावरील लेख आवडला ... धन्यवाद