मी ऑगस्ट 2017 मध्ये अक्षर मैफल हे मासिक सुरू केलं. त्याच्या आधी मे 2015 ते डिसेंबर 2015 मी 'चाणक्य मंडल परिवार'चं स्वतंत्र नागरीक साप्ताहिक बघत होतो. आणि त्याच्याही आधी मी चाणक्यमध्ये दोन कोर्स केले होते. पदवीच्या पहिल्या वर्षी फाउंडेशन आणि नंतरच्या वर्षी प्रिपरेटरी. प्रत्यक्ष कोर्सला प्रवेश घेण्यापुर्वी किमान 3 वर्ष मी अविनाश धर्माधिकारी हे नाव ऐकत होतो. दहावीच्या शेवटी शेवटी मी 'आपण त्यांच्या समान व्हावे' ही धर्माधिकारी सरांची व्याख्यानमाला ऐकली होती. माझ्या सुदैवाने मला संपूर्ण व्याख्यानमाला मिळाली नव्हती. साधारण दहावीच्या शेवटीपासून बारावीच्या निकालापर्यंत मी फक्त शिवाजी आणि महात्मा गांधी यांच्यावरची व्याख्यानं ऐकत होतो. त्याच्या जोडीला शिवाजीराव भोसले आणि राम शेवाळकर हे होते. या तिघांची बोलण्याची स्टाईल पूर्णपणे वेगळी होती. शिवाजीराव अतिशय शांत, संथ पण मंत्रमुग्ध करणारं बोलायचे. राम शेवाळकर मात्र आवेशपुर्ण पण गंभीर आणि विचारप्रवृत्त करणारं बोलायचे. धर्माधिकारी सरांची स्टाईलही वेगळी होती. आता या सर्व गोष्टी घडून, उलटून जवळ जवळ 10 वर्ष होत आली. आता मी थोडा सेट झालो, आता चार लोकं कौतुकाने बघतात, 2 लोकं कौतुक करतात, एखादा तर आदरानेही बघतो. मधल्या 10 वर्षांत खुप गोष्टी पुढे सरकल्या. आता लोकं आई बाबांना सांगतात की, मुकुल वेगळा आहे, खुप शांत आहे, खुप विचार करतो, असा मुलगा असणं हे भाग्याचं असतं वगैरे.. या सगळ्याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा विचार करतो की मी काय केलं? काय वेगळं केलं ज्यामुळे मी समजूतदार झालो? विचारी झालो? आणि मला आठवतं की, मी या लोकांच्या भाषणांची पारायणं केली होती. त्यातली अनेक तर माझी अजुनही पाठ आहेत. या भाषणांनी मला खुप प्रगल्भ केलं आणि त्यामध्ये ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
suhasnannajkar07@gmail.com
5 वर्षांपूर्वीखुप छान लेख
suhasnannajkar07@gmail.com
5 वर्षांपूर्वीयोग्य व्यक्ती बद्दल योग्य लेखन
ravishenolikar
5 वर्षांपूर्वीछान लेख. धर्माधिकारींमुळेच मीही महात्मा गांधीना समजून घेण्याचा प्रयत्न केला. अस्वस्थ दशकाची डायरी वाचून मीही प्रभावित झालो होतो.