नागरिकांचा डेटा ही 'सार्वजनिक मालमत्ता' - पंकज येलपले

पुनश्च    मुकूल रणभोर    2019-12-28 06:00:35   

    देशाची अर्थव्यवस्था अधिकाधिक डिजिटल करण्यासाठी भारत सरकारने महत्वाकांक्षी 'डिजिटल इंडिया' कार्यक्रम हाती घेतला. अर्थव्यवस्था डिजिटल होण्याने, म्हणजेच रोजच्या जगण्यातले अनेक व्यवहार आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने 'ऑनलाईन'  झाल्यास त्याचे अनेक फायदे आहेत. जसे की, केल्या जाणार्‍या प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवता येते; त्यामुळे बेनामी किंवा अवैध व्यवहार बंद होण्यास मदत होईल. दोन व्यक्तींमध्ये डिजिटल पद्धतीने व्यवहार झाल्यास दोघांकडे त्या व्यवहाराचा पुरावा सहज आणि शाश्वतरित्या उपलब्ध असेल. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होत असल्याने व्यवहार पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल. आपण पाहतच आहोत की डिजिटल व्यवहारांमुळे सरकारला आपल्या योजना अधिक प्रभावीपणे राबवता येत आहेत.   हे व्यवहार डिजिटल पद्धतीने केले जात असताना सतत नवनवा 'डेटा' म्हणजे माहिती तयार होत जाते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने ऑनलाईन फूड डिलिव्हरी अँपवरून एखादा खाद्यपदार्थ मागवला, तर त्या व्यक्तीस या हॉटेलमधला हा पदार्थ आवडतो, ही 'माहिती' मिळते. 'पेटीएम'सारख्या पेमेंट अँपवरून एखादी व्यक्ती ठिकठिकाणी पैसे भरत असेल तर ती व्यक्ती काय खाते, कशाने प्रवास करते, कोणती कपडे घालते, तिचे आरोग्य कसे आहे, तिचा मासिक खर्च किती, ही सर्व अप्रत्यक्षपणे मिळालेली माहिती किंवा 'डेटा'च आहे. हा झाला 'व्यक्ती' या सूक्ष्म पातळीवरचा विचार. थोडं वरच्या पातळीला, म्हणजे, एक गाव, शहर, राज्ये आणि देशपातळीला जर अशी मिळत गेली तर त्यानुसार त्या देशातल्या नागरिकांचे जीवनमान कसे आहे, याचा अंदाज यायला लागतो. या अंदाजावरून भविष्यातली आर्थिक धोरणे ठरवता येतात. त्यावरून भविष्यातल्या अर्थव्यवस्थेची दिशा कळते. हे सगळे 'डेटा' किंवा 'माहिती ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रासंगिक , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts