साहित्यिकांचे 'पुल'कृत भविष्य १९४८


पु. ल देशपांडे यांनी लिहिलेला 'गाळीव इतिहास' ज्यांनी वाचला आहे त्यांना पुलंच्या साहित्यिक प्रहसनातला शाब्दिक हातोडा ठणठणपाळाच्या ठोक्यांपेक्षा कमी नाही हे लक्षात आले असेलच. पुलंनी  केवळ साहित्य आणि साहित्यिकांची, त्यांच्या वृत्तींची खिल्ली उडवणारे असे लेखन तुलनेने कमी केले, कारण त्यांच्या लेखनाचा आणि विनोदाचा पैस खूप मोठा होता. प्रस्तुत लेखात पुलंनी एकेका राशीच्या साहित्यिकांचे काल्पनिक भविष्य लिहिले आहे ते काल्पनिक म्हणावे का असा प्रश्न खरेच पडेल. मूळ भविष्य  'अभिरुची' च्या फेब्रुवारी १९४८च्या अंकात प्रसिद्ध झाले होते, ते अनेक लेखकांना आजही तंतोतंत लागू होते, हाच तर 'पुलकित' गुण. ************* अंक – अभिरुची – फेब्रुवारी १९४८एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा.” -    एकाजनार्दन यंदा चैत्रापासून नूतन वर्ष सुरू होईल. भविष्याच्या दिव्य कारगिराच्या कारखान्यांतील कालयंत्राचा एक आटा ह्या मुहूर्तावर फिरेल आणि पुढल्या वर्षी आपल्या नशिबांत काय लिहून ठेवले आहे हे जाणण्याचे कुतूहल सर्वांच्या अंतःकरणात जागृत होईल. ह्या मर्त्य सृष्टीतले प्राणिमात्र त्या अनंत लीलावतारी परमेश्र्वराच्या खेळांतली केवळ बाहुली आहेत. सारी सूत्रे तिथून हालत आहेत. बुद्धिवादाच्या कितीही वल्गना केल्या तरी शेवटी प्राक्तनी लिहिले असेल तेच घडणार. परंतु पाश्र्चात्त्य विचारांनी अंध झालेल्यांना हे कसे कळणार? फलज्योतिष्याच्या दिव्यदृष्टीने भविष्यकालाचा आलोक दृष्टीसमोर उभा करता येतो. तेव्हा त्या शास्त्राचा आपण शक्य तितका उपयोग करून घेतला पाहिजे. अज्ञानजन्य मूढतेने यच्चयावत् मानवमात्र कुठलीहि गोष्ट ‘मी करतो’ ह्या अहंमन्यतेने पछाडला गेला आहे. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , अभिरुची

प्रतिक्रिया

  1. JAYANT PRABHUNE

      3 वर्षांपूर्वी

    खोगीरभरती या पुस्तकात आहे

  2. JAYANT PRABHUNE

      3 वर्षांपूर्वी

    खोगीरभरती या पुस्तकात आहे

  3. shripad

      5 वर्षांपूर्वी

    लग्ने झालेल्या कवयित्रींचे पती दुःखी होतील आणि घटस्फोट झालेल्यांचे सुखी होतील. माझा बाळपणाचा स्नेही मॅक्मिलन् ह्याने आपल्या कॉपीबुक ह्या विद्वत्ताप्रचुर आणि तत्त्वज्ञानविषयक ग्रंथांत म्हटल्याप्रमाणे “वन मॅन्स फुड ईज अनदर मॅन्स पॉयझन्!” ???



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts