स्वतःमधले दोष शोधणे आणि शोधल्यावर तो स्वीकारणे; या दोन गोष्टी जर झाल्या, तर मग तो दोष दूर करण्याचे प्रयत्न करता येतात. ‘भारतीय समाज’ आणि ‘भारतीय वृत्ती’ या यांकडे आपण देशभक्ती आणि फुगवलेल्या अस्मितांचा चष्मा काढून ठेवून पाहिलं तर अनेक दोष दिसून येतील. त्यातला एक ठळक दोष आहे तो ‘थूकपॉलिश’चा. म्हणजे नेमकं काय, ते या उद्बोधक लेखात अजित कानिटकर यांनी मार्मिक पद्धतीनं सांगितलेलं आहे. ********** अंक-अंतर्नाद, जानेवारी २०११ दररोजच्या जगण्यात – हजारोंच्या बोलण्या-चालण्या-वागण्यात उत्तमता, नीटनेटकेपणा, टापटीप, शिस्त, आखीवरेखीवपणा येण्यासाठी आपल्या समाजाला कोणत्या दिव्यातून जावे लागेल, हे समजत नाही. कॉमनवेल्थ गेमच्या पूर्वतयारीमागे जे रामायण-महाभारत घडले, त्यातून आपण काही शिकणार का, असाही प्रश्न सतावत राहतो... कॉमनवेल्थ गेम्स संपून बरेच दिवस झाले आहेत. पण अजूनही अधूनमधून संपूर्ण दिल्लीभर या खेळांची चर्चा चालू आहे. ही चर्चा सर्व वाहिन्या, वृत्तपत्रे यांमधूनही गाजतेय. मला पंधरा वर्षांपूर्वी ऐकलेल्या एका शब्दाची आठवण या निमित्ताने वारंवार येते आहे. १९९५ ते २००१ या सहा वर्षात पुण्यात राहत असताना भारतभरच्या अनेक कारखान्यांमध्ये त्यांच्या अधिकारी-कामगारांसाठी व्यवस्थापन प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी मी जात असे. पुण्याजवळच्या एका प्रसिद्ध कारखान्यात प्रशिक्षण वर्ग घेत असताना ‘थूकपॉलिश’ हा शब्द प्रथमच कानावर पडला! (हा शब्द मराठी शब्दकोशात बहुधा नसावा!) १९९५ मध्ये हा कारखाना एका प्रसिद्ध उद्योगसमूहाच्या मालकीचा होता, तसा तो आजही आहे. पण त्यावेळेस या कारखान्याची स्थिती फारशी चांगली नव्हती. चारचाकी वाहने बनविणाऱ्या या कारखान ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
arush
6 वर्षांपूर्वीनिदान आपण तरी आपल्या वागण्यातून ही वृत्ती हद्दपार केली पाहिजे हे नक्की
deepa_ajay
6 वर्षांपूर्वीजुगाड असा पण एक मूळचा हिंदी पण आता मराठीत रुळलाय आपल्या कडे जुगाडू वृत्ती फार आहे कस ही करून ढ कलून द्यायचं ही वृत्ती
vilasrose
6 वर्षांपूर्वीलेख आवडला.आपल्या देशात रस्त्यांची अवस्था चांगली नाही,याला थूकपाँलीश हि व्रुति जबाबदार आहे.पावसाळा संपल्यावर खराब झालेले रस्ते दरवर्षी थूकपाँलीश करून पुन्हा चकाचक होतात.पुन्हा पावसाळा आला किं,जैसे थे.
Mannishalohokare
6 वर्षांपूर्वीखुप वाईट वाटलं हे आपल्या देशात सर्रास चालत
bookworm
6 वर्षांपूर्वीथूक पट्टी असाही शब्द आहे.
shripad
6 वर्षांपूर्वीएकदम मार्मिक शब्द आहे.