पु. वि. उर्फ राजाभाउ बेहरे यांनी (११ जून १९३१ - २७ जानेवारी २०००) यांनी १९५९ साली ‘मेनका’ हे मासिक काढले. त्यांच्या पत्नी सुमनताई बेहरे यांची त्यांना त्यात साथ होती. आचार्य अत्र्यांनी केलेल्या टीकेचा फायदाच होऊन ‘मेनका’ने चांगले बाळसे धरल्यावर बेहऱ्यांनी १९६३ साली ‘माहेर’ आणि १९६५ साली ‘जत्रा’ सुरु केले. या तिन्ही नियतकालिकांनी सामान्य वाचक तसेच गृहिणींना वाचनाची आवड जोपासण्याची सवय लावली, सोयही केली. या तिन्ही मासिकांमधील मजकुराचे स्वरुप वेगवेगळे होते, त्यांनी ते आवर्जून जपलेही. ‘माहेर’चा शंभरावा अंक प्रकाशित झाल्याचा समारंभ आणि अंकाच्या प्रकाशनाचा घाट का घातला गेला, याची पार्श्वभूमी, यावर हा लेख लिहिलेला आहे. त्याची शैली, कोपरखळ्या, विडंबन, टोले, टवाळी या सर्व गोष्टींमुळे तो विलक्षण वेगळा झाला आहे. विशेष म्हणजे तो ‘माहेर’च्याच एप्रिल १९७०च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. लेखिकेने ‘गर्गशा’ या टोपण नावाने तो लिहिला आहे. गर्गशा याचा अर्थ ‘कैदाशीण’ असाही होतो आणि भांडण,तंटा, वाद या अर्थानेही हा शब्द वापरला जातो. या सर्व अर्थांनी हे टोपणनाव सार्थ करणारा हा लेख आहे, असेच म्हणावे लागेल. ********** अंक: माहेर, एप्रिल १९७०हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
असून अडचण...
वाचण्यासारखे अजून काही ...
sa
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च