अंक - एकता १९५३ आपल्या घटनेने शासकीय व्यवहारातून धर्म बाद केला तरी तो व्यवहारात केवळ उरला, एवढेच नव्हे तर आपल्या सार्वजनिक आचारा-विचारांना तो व्यापून राहिलेला आहे. धर्म आणि नीती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे मान्य केले की लगेचच पुढला प्रश्न येतो, की 'कोणता धर्म?' या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक समाज 'माझा धर्म' असे देतो आणि मग पुन्हा तेच सुरु होते जे आपण टाळण्याचा प्रयत्न करत आलो आहे. शाळेतच धर्मशिक्षण दिले पाहिजे असा एक जोरदार मतप्रवाह स्वातंत्र्यानंतर काही काळ होता. त्याचाच उच्चार करणारा हा लेख १९५३ साली प्रसिद्ध झाला होता. शाळेत धर्माचे शिक्षण देण्याचा पुरस्कार करणाऱ्या या लेखकाला अज्ञात राहावे लागले यावरुन या विचाराला समाजात किती 'पाठिंबा' होता हे तर स्पष्ट होतेच शिवाय 'नैतिकतेचा' प्रश्नही निकाली निघतो. ‘अप्रिय परंतु हितकर’ असे बोलणारा व ऐकणारा दुर्मिळ असतो, असे एक संस्कृत सुभाषित आहे. आपल्या भारतवर्षात आजच्या काळात अशा काही थोड्या वक्त्यांपैकी श्री. राजगोपालाचार्य हे एक आहेत. ‘चारित्र्यवान् माणसे काँग्रेसच्या बाहेरच अधिक आहेत’ या त्यांच्या वक्तव्याचा उल्लेख आम्ही एकदा केलेला वाचकांना आठवत असेलच. दि. २७ डिसेंबरला हैदराबाद येथील ‘नॅशनल युनियन ऑफ स्टूडण्ट्स’च्या परिषदेचे उद्घाटन करताना श्री. राजगोपालाचार्य यांनी असेच परखड उद्गार काढले आहेत. ते म्हणाले – “पूर्वी पालक धर्मज्ञानी होते. ते मुलांना घरच्या घरी धर्मशिक्षण देत असत. आताच्या पालकांचे ज्ञान ‘अर्जुन व कर्ण हे नेपोलियनचे भाऊ तर नव्हेत?’ असे विचारण्याइतक्या थराला गेले आहे. तेव्हा ‘धर्मशिक्षण घरी द्यावे; शाळा कॉलेजात त्यांचा संपर्क नको’ असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. चारित्र्य ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
arvindchavan77777@gmail.com
5 वर्षांपूर्वीविचाराला चालना देणारा लेख आहे.आजच्या शिक्षण पद्धतीत धार्मिक शिक्षण दिले जात नाही. पण चांगले संस्कार हे घरातच मिळतात व हे यात धर्माचे मोठे योगदान असते. मग शिक्षण पद्धती त धार्मिक शिक्षण दिले पाहिजे असे वाटते. मुस्लिम लोक आजही धार्मिक शिक्षणाला महत्व देतात. मग हिंदुनी धार्मिक शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे. त्या शिवाय आपण नेमके कोण आहोत व जीवनाचे प्रयोजन काय असावे हे अधिक विस्ताराने नवीन पिढी ला समजून घ्यायला पाहिजे.
ajitbmunj
5 वर्षांपूर्वीमला आतापर्यंत खुप वेळा हा प्रश्न पडला होता की धर्माची खरच आताच्या जगात कायआवश्यकता आहे?? फार पूर्वी माणूस धर्म नसताना सुद्धा चांगलं आयुष्य जगत होताच ना?? धर्म आला नि त्यात बरेच पंथ , जात, विचारधारा आल्या नि संपुर्ण आयुष्य ढवळून निघाले.. या लेखाने काही प्रमाणात का होईना माझ्या शंकेचे निरसन झाले.. फक्त येथे धर्म म्हणजे लेखकाला काय अपेक्षित आहे ते नाही कळाले.. धन्यवाद
Ajaypkale1@gmail.com
5 वर्षांपूर्वीअतिशय मुद्देसूद विश्लेषण केले आहे..आजच्या काळात धर्माची व नैतिक शिक्षणाची आवश्यकता का आहे याचा विचार व्ह्यालाच पाहिजे..