अंक : अंतर्नाद
तेहतीस वर्षांपूर्वी दिल्ली विश्वविद्यालयाच्या 'आधुनिक भारतीय भाषाविभागा'तील अध्यापकवर्गात मी प्रविष्ट झालो तेव्हा देशभरातल्या विविध भागांमधून आलेले प्राध्यापक माझे सहकारी बनले. त्यावेळी असमिया, बांगला, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि मणिपुरी अशा बारा भाषांचा त्या विभागात समावेश होता. या सगळ्या प्राध्यापकांमध्ये असमिया भाषेची त्यावेळी प्रपाठक असलेली इंदिरा गोस्वामी चटकन कुणाचेही लक्ष वेधून घेईल अशीच होती. अडतीस वर्षांची ही तरुण प्राध्यापिका भडक प्रसाधन करून विद्यापीठात यायची, अतिशय महाग साड्या नेसायची, आणि मुख्य म्हणजे सगळ्या प्राध्यापकांत तिची एकटीची गाडी होती. ड्रायव्हर होता. विभागाने आयोजित केलेल्या चर्चासत्रांमध्ये अथवा डिपार्टमेंटल कौन्सिलच्या बैठकींमध्ये ती फारशी बोलायची नाही; पण एवढ्या-तेवढ्या कारणाने खळखळून मधुर हास्य करायची आणि वातावरण उत्साहाने भारून टाकायची. चारपाच वर्षे, 'एक आकर्षक व्यक्तिमत्वाची श्रीमंत सहकारी प्राध्यापिका’ यापलीकडे तिच्याविषयी मला जास्त काहीच माहिती नव्हती. असमियाची ती एकटीच प्राध्यापिका त्यावेळी असल्यामुळे तिला तास भरपूर होते, आणि तिच्याभोवती सतत विद्यार्थ्यांचे कोंडाळे असायचे. मीही दिल्लीच्या सर्वस्वी परक्या वातावरणात मुळे रुजविण्याच्या व्यापात व्यग्र असल्यामुळे आमच्यात फारसे संभाषणही होत नव्हते. तिच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा "ही मामोनी रायसम गोस्वामी तुझ्या नात्यातली आहे का?' असे मी इंदिरेला विचारले; आणि तिने 'मीच ती' म्हणून सांगितल्यावर अविश्वासाने काही क्षण तिच्याकडे पाहत राहिलो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
भाषा
, स्त्री विशेष
, व्यक्ती विशेष
, साहित्य रसास्वाद
व्यक्ती विशेष
Swapna Patwardhan
4 वर्षांपूर्वीत्यांच्या कादंबऱ्याचे मराठी मध्ये भाषांतर झाले असल्यास वाचायला आवडेल विषय खूप वेगळे वाटतात
Swapna Patwardhan
4 वर्षांपूर्वीत्यांच्या कादंबऱ्याचे मराठी मध्ये भाषांतर झाले असल्यास वाचायला आवडेल विषय खूप वेगळे वाटतात
Seema Joshi
4 वर्षांपूर्वीफारच सुरेख लेख
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीखूपच छान व्यक्तीचित्रण.
Shriniwas Kalantri
4 वर्षांपूर्वीमार्मिक लेखन
shripad
5 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख!