मीच हे सांगितलं पाहिजे (एक आगळे जीवनचित्र)


अंक: युगवाणी सप्टेंबर १९६९ आमच्या लग्न-प्रसंगी आमच्या एका वऱ्हाडी मित्राने संपूर्ण ज्ञानकोशाचे खंड आम्हाला भेट म्हणून दिले आहेत. अनेकदा हारीने लावलेल्या ज्ञानकोशाचा एखादा खंड बाहेर निघतो आणि हवी असलेली माहिती अचूक त्यातून मिळाली म्हणजे प्रत्येक वेळी ज्ञानाचं सारं भांडार आपल्या मुठीत आल्याचा आनंद होतो. त्यानिमित्ताने, मग, ज्ञानकोशकार केतकरांची स्मृती ताजी होऊन मन भरून येतं. असा ज्ञानवंत, असा पंडित, असा प्रौढ प्रज्ञेचा माणूस महाराष्ट्रात जन्माला यावा, याबद्दल अभिमानाने मन फुलतं. अगदी अलीकडे शीलवतीबाई केतकरांचं, ‘‘मीच हे सांगितले पाहिजे’’ हे पुस्तक वाचून संपविलं, आणि माझ्या मनात विचार आला, की ‘ज्ञानकोश, हा केतकर पती-पत्नीच्या अमर प्रीतीचा स्मारक ग्रंथ’ म्हणून मानला, तर त्यात कुणालाही अतिशयोक्ती वाटायला नको. नवविवाहित दंपतीला समग्र ज्ञानकोश भेटी दाखल देताना, आमच्या वऱ्हाडी मित्राने नकळतच पण फार मोठी योजकता दाखविली होती. [caption id="attachment_1677" align="alignright" width="300"] केतकर कुटुंबीय[/caption] असं मी म्हणते ह्याला कारण आहे. शीलवतीबाईंचं पुस्तक वाचून मी संपविलं आणि केतकरांच्या आधी शीलवतीबाईंचंच सारं सोज्ज्वळ व्यक्तिमत्त्व अगदी सहजपणे माझ्या मन:चक्षूंसमोर उभं राहिलं. ही अशी पत्नी, - हा असा पती! विधात्याला कधी कधी जोडे काय अचूक जमवित ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


युगवाणी , पुस्तक परिचय , स्त्री विशेष , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. किरण भिडे

      8 वर्षांपूर्वी

    ग्रंथसखा चे श्याम जोशी ९३२००३४१५६ यांच्याशी संपर्क साधा.

  2. Manasi

      8 वर्षांपूर्वी

    ही पुस्तके कुठे मिळू शकतील?



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts