साम्राज्यशाहीची चिकित्सा

पुनश्च    द. श्री. मराठे    2020-03-25 06:00:06   

अंक - वसंत ऑक्टोबर १९६० साम्राज्यशाही, भांडवलदारी, हकुमशाही या शब्दांबद्दलही आपल्याला मोठा तिटकारा आहे. लोकशाही व्यवस्थेत या सर्व संस्थांचं दमन होऊन प्रत्येक बाबतीत लोकांच्या हिताचा विचार व्हावा अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात काय झालं? लोकशाहीनंही जिल्ह्याजिल्ह्यात नवे संस्थानिक निर्माण केले. साम्राज्यशाही या संकल्पनेचा आणि काही बाबतीत देशातील हवामानाचा आपल्याला कसा राजकीय फायदा झाला याचा आणि जगभरातील साम्राज्यशाहीचा घेतलेला हा अतिशय अभ्यासपूर्ण आणि विस्तृत आढावा. साठ वर्षांपूर्वी वसंत या मासिकात आलेला हा लेख इतिहासाचं मनन, चिंतन करायला लावतो आणि व्यापक दृष्टिकोन देतो. लेखक दत्तात्रय श्रीधर मराठे (१३ फेब्रुवारी १९०६ - ३ डिसेंबर१९९२) हे जागतिक राजकारणाचे गाढे अभ्यासक. ‘जगाचा इतिहास’, ‘भारत-पाक युद्धविचार’, ‘भारताचे शेजारी’, ‘अमेरिकन काँग्रेस’, ‘चीनच्या प्रचंड भिंतीमागे’ ही मराठे यांनी लिहिलेली प्रमुख पुस्तके आहेत. ********** आपण स्वतंत्र होण्यापूर्वी साम्राज्यशाही हा आपल्या दृष्टीने ज्वलंत प्रश्न होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या प्रश्नाची तीव्रता कमी झाली पण साम्राज्यशाहीच्या विरुद्ध आपल्या मनात जी अढी बसली ती काही म्हणण्यासारखी कमी झाली नाही. साम्राज्यशाही वसाहतीतील लोकांचा दर्जा, तद्देशीय लोक आणि वसाहतवाले लोक याचे परस्परसंबंध, लोकांच्या किती पिढ्या एखाद्या देशांत गेल्या म्हणजे त्यांना त्या देशातील लोक समजावयाचे इत्यादी प्रश्नांच्याबद्दल शांत आणि स्थिर मनाने विचार करण्यासारख्या मन:स्थितीमध्ये आपण अद्याप आलो नाही. साम्राज्यशाही धोरण असा शब्द काढला की अजून आपले पित्त खवळते आणि भावनाप्रधान होऊन पुढारीसुद्धा अद्वातद्वा बोलू लागतात. पण शांतपणाने विचार करण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , इतिहास , वसंत , दीर्घा

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts