अंक – ललित, जानेवारी, १९७७
लेखाबद्दल थोडेसे : मुंबई हे राजकीय प्रभावक्षेत्र असल्याने या परिसरातील संपादकांची, त्यांच्या कर्तृत्वाची नेहमीच अधिक चर्चा होते. परंतु अनंतराव भालेराव, रंगा वैद्य, भाऊसाहेब माडखोलकर यांनी अनुक्रमे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात राहून जो संपादकीय ठसा उमटवला त्याला तोड नाही. त्यापैकी भाऊसाहेब उर्फ गजानन त्र्यंबक माडखोलकर (२८ डिसेंबर १९०० – २७ नोव्हेंबर १९७६) यांनी ललित लेखक म्हणूनही तेवढीच मोठी कामगिरी केली होती. भंगलेले देऊळ, मुक्तात्मा अशा त्यांच्या कादंबऱ्या खूप गाजल्या आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यापर्यंत त्यांनी मजली मारली. माडखोलकर हे मूळचे पश्चिम महाराष्ट्रातले परंतु त्यांची कर्मभूमी होती विदर्भ. ते तना-मनाने पुढे विदर्भाचेच झाले. ‘तरुण भारत’ला त्यांनी विदर्भात दैनिक म्हणून लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली.अत्रेंसारखा धुरंधर संपादकही ‘मराठा’चा गाशा गुंडाळून वर्षभरात विदर्भातून निघून गेला तो तरुण भारतच्या वाचकांवरील प्रभावामुळेच. माडखोलकर यांच्या व्यक्तिमत्वाची, स्वभावाची आणि कर्तृत्वाची ओळख करुन देणारा प्रस्तुत लेख, माडखोलकरांच्या निधनानंतर ‘ललित’ मासिकाच्या जानेवारी १९७७च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.
**********
(मूळ शिर्षक -भाऊराव माडखोलकर )
ऑक्टोबर महिन्यात ती. भाऊरावांचा मला फोन आला, “माझा हा शेवटचा फोन आणि मी तुला आयुष्यातले अखेरचे काम सांगत आहे.’ “सांगा.” “तू ताबडतोब माझ्यासाठी मरणाची गोळी घेऊन ये—” आणि त्यांनी फोन बंद केला. मी लगेच भाऊरावांकडे जाऊन पोचलो. काम टाळणाऱ्या नोकराकडे मालकाने पाहावे, तशी नजर रोखत ते म्हणाले, “तू मरणाची गोळी आणली आहेस?” “हो भाऊराव.”
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
EXPLORE THE BEST
4 वर्षांपूर्वीमाडखोलकर हे मूळचे कोकणातल्या 'माडखोल' गावचे असं वाचलेलं आठवतंय. त्यांचा जन्म पोंभुर्ले (देवगड) गावी झाला होता. माडखोल गाव हे सावंतवाडी बेळगाव मार्गावर वाडीपासून जवळ आहे.
drratnakar16@rediffmail.com
5 वर्षांपूर्वीतरुण भारत हेच वर्तमानपत्र आपले वाटते. माडखोलकरांना नागपूरकरांनी त्रासही दिला त्याबद्दल वाईट वाटते.
hpkher
5 वर्षांपूर्वीमाडखोलकरांबद्दल पश्चिम महाराष्ट्रात आदर असला तरी माहिती कमी आहे, हा लेख वाचून छान वाटलं.
atmaram-jagdale
5 वर्षांपूर्वीमाडखोलकरांची भंगलेले देऊळ ही कादंबरी मी वाचली आहे इतर काही वाचनात आले नाही पण लेख वाचून बरेच समजले .
deshmukhmohan0@gmail.com
5 वर्षांपूर्वीमाडखोलकरांबद्दल आदर होताच,तो आनखी दुनावला
prashant1414joshi@gmail.com
5 वर्षांपूर्वीमाडखोलकर यांचे निबंधकार चिपळूणकर यांच्या कालखंडाचा उहापोह करणारे पुस्तक म्हणजे , त्याकाळाचा आरसा म्हणावे लागेल ...
punekar
5 वर्षांपूर्वीलहानपणापासून आम्ही तरूण भारतच वाचत आलो आहोत. डाॅ चौबे यांना मेडिकल कॉलेज मध्ये आजी आजोबां सोबत जात असल्याने बघण्याचा योग आला. आज 30 वर्षानंतर त्यांची आठवण झाली. नागपूरातील समकालीन परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहिली. भाऊसाहेबां सोबत घनिष्ट संगत असल्याने लेखकांकडून अभ्यासपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद.
test
5 वर्षांपूर्वीएका निस्पृह व्यक्तिमत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.