बाबरी : जे दिसले तेच सांगितले


 ऑर्गनायझर या साप्ताहिकात प्रसिद्ध झाला आहे. त्याचा हा अनुवाद. लेखाबद्दल थोडेसे :  मंदिराला उद्ध्वस्त केल्यानंतर तिथे वादग्रस्त ढांचा उभारण्यात आला, या महत्त्वाच्या पूर्वपक्षावर रामजन्मभूमी आंदोलनाचे सारतत्त्व आधारलेले आहे. या आंदोलनाच्याही पूर्वी अयोध्येत पुरातत्त्वीय उत्खनन करण्यात आले होते. प्रो. बी. बी. लाल यांच्या चमूने, ज्यात डॉ. के. के. मोहम्मदही होते, जे पुरातत्त्वीय पुरावे गोळा केलेत, त्याने सिद्ध केले की, त्या वादग्रस्त जागी आधीपासून अस्तित्वात असलेल्या वास्तूचा विध्वंस करण्यात आला होता. मूळ मल्याळम भाषेत लिहिलेल्या ‘जान एन्ना भारतीयन’ (मी, भारतीय) या पुस्तकात डॉ. मोहम्मद यांनी इतिहासाचे पुनर्विलोकन करण्याच्या शास्त्रीय पद्धतीची संपूर्ण प्रक्रिया विशद केली आहे. अयोध्येच्या विषयावर चर्चा करताना किंवा तो मांडताना या पुस्तकातील प्रस्तुत काही अंश महत्त्वाचे सिद्ध होऊ शकतात.  ऑर्गनायझर या साप्ताहिकात प्रसिद्ध झाला  हा अनुवाद  तुमच्यासाठी पुनश्च ********** हा भाग सांगितल्याशिवाय माझ्या जीवनाची कहाणी पूर्ण होणार नाही. यात कुणाच्या धार्मिक भावना दुखविण्याचा उद्देश नाही किंवा दुसर्‍या कुणाच्या भावना भडकविण्याचाही. या दोन्हींसाठी या लिखाणाचा कुणीही वापर करू नये. १९९० साली अयोध्येचा मुद्दा चांगलाच तापला होता. त्यापूर्वी, १९७८ साली पुरातत्त्वशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला अयोध्येचे सर्वेक्षण करण्याची संधी मिळाली.  ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , राजकारण , अनुभव कथन , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. अनिल गिरी

      5 महिन्यांपूर्वी

    हा लेख वाचल्यावर फक्त एकच शब्द मनात निर्माण होतो तो म्हणजे "अप्रतिम"

  2. bookworm

      5 वर्षांपूर्वी

    अतिशय समतोल व अभ्यासपूर्ण लेख! खरं तर या महाशयांचा यथोचित सत्कार भारत सरकारने केला पाहिजे.

  3. shripad

      6 वर्षांपूर्वी

    "भारतीय धर्मनिरपेक्षतेचा तो एक रोमांचक अनुभव होता. राष्ट्रीय स्मारकांच्या रक्षणासाठी मुस्लिम, हिंदू व ख्रिश्‍चन पहारा देत उभे होते." वा, छान! "उत्खनन निष्पक्ष व्हावे म्हणून १३१ उत्खननकर्त्यांमध्ये ५२ मुस्लिमांना घेतले होते. एवढेच नाही, तर बाबरी मशीद कृती समितीच्या पुरातत्त्वीय इतिहासकार व प्रतिनिधींच्या (नामे सूरज भान, मंडल, सुप्रिया वर्मा व जया मेनन) उपस्थितीत उत्खनन करण्यात आले. उत्खनन याहून अधिक निष्पक्ष करता आले असते काय?" एवढ्या पारदर्शी पद्धतीने उत्खनन केले असता त्यावर कोणी शंका घेण्याचे काही कारण नाही. "जर भारत एक मुस्लिमबहुल सेक्युलर देश असता (तसा मुस्लिमबहुल देश कधीही सेक्युलर राहूच शकत नाही) आणि जर एखाद्या मुस्लिम नेत्याने मंदिराच्या (जे एक राष्ट्रीय स्मारक आहे) परिसरात अवैधपणे मशीद बांधण्याचा प्रयत्न केला आणि एका हिंदू अधिकार्‍याने त्याला विरोध केला, तर किती मुसलमान त्या अधिकार्‍याच्या पाठीशी उभे राहतील? भारताच्या पंथनिरपेक्ष-वृत्तीची ही महानता आहे." या लेखातील एक-एक वाक्य असं अवतरण चिन्हात घालावं असं वाटतंय. "हिंदूंमधील जातीयवाद हा काही त्यांचा मूळ स्वभाव नाही. बरेचदा एखाद्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून तो बाहेर येतो. गोधराच्या घटनेच्या संदर्भातही हे लागू आहे." खरं आहे. "भारत जर मुस्लिमबहुल देश असता आणि अल्पसंख्य हिंदूंना स्वतंत्र देश दिल्यावर, त्याने आपणहून स्वत:ला सेक्युलर म्हणून घोषित केलेच नसते. ही उदार वृत्ती हिंदुत्वात स्वभावत:च आहे. सहिष्णुता हा हिंदुत्वाचा स्वभाव आहे. आम्ही या स्वभावाला समजून घेतले पाहिजे. आम्ही या मानसिकतेचा आदर केला पाहिजे. भारतात हिंदूंऐवजी दुसर्‍या कुठल्या धर्माच्या लोकांची बहुसंख्या असती, तर मुसलमानांची काय दशा झाली असती, याचा तुम्ही विचार केला तर बरे होईल. प्रत्येकाने या अशा ऐतिहासिक वस्तुस्थितीला समजून घेतले पाहिजे आणि तडजोडीसाठी तयार राहायला हवे. तरच आम्ही खर्‍या अर्थाने सेक्युलर देश बनू शकतो." हे प्रत्येक मुस्लिमाने लक्षात घेतले पाहिजे.

  4. hpkher

      6 वर्षांपूर्वी

    अतिशय उत्तम लेख, समतोल पणाने मांडला आहे.

  5. vivek

      7 वर्षांपूर्वी

    indian culture and its specialties are part of our real life and it is necessary for our future generation

  6. nikasawadekar

      7 वर्षांपूर्वी

    इतक्या प्रामाणिक, सविस्तर आणि माहितीपूर्ण लेखाबद्दल विनम्र आभार!!

  7. Rashmi Shetye

      7 वर्षांपूर्वी

    संशोधन पूर्ण लेख आहे.

  8. प्राजक्ता देवधर

      7 वर्षांपूर्वी

    इतक्या प्रामाणिक पणे केलेले संशोधन आणि त्या वरील निष्ठा अत्यंत कौतुकास्पद, आदरणीय.

  9. अमर पेठे

      7 वर्षांपूर्वी

    वाह, फारच मस्त



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts