लिखाणपद्धतींची 'मिसळ'

पुनश्च    शेफाली वैद्य    2017-12-15 06:00:35   

शेफाली वैद्य यांच्या फेसबुकवरुन साभार बातमी दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला. ही बातमी विस्ताराने लिहा... * नवकथा मुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्ट सारखंच. मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला. तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया आहेत, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा बाय सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचं त्राण त्याला नव्हतं म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला आणि चार घासात संपवून टाकला. * नवकविता स्टेशनसमोरची रंगहीन टपरी पुलाखाली झोपणाऱ्या म्हातारीसारखी अंग चोरून पडलेली वडे तळणाऱ्या माणसाच्या कपाळावर तरंगणारे घामाचे थेंब ठिबकतायत पुढ्यातल्या क ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अवांतर , भाषा , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. Vilas15

      5 वर्षांपूर्वी

    classic lekh aahe

  2. अजय जाधव

      7 वर्षांपूर्वी

    मस्तच..बोले तो एकदम झक्कास ??

  3. Raj Gokhale

      7 वर्षांपूर्वी

    Sunder,,,,Shefali mam hats off

  4. Shivraj

      8 वर्षांपूर्वी

    goood one

  5. kiran bhide

      8 वर्षांपूर्वी

    १००% करणार. सोशल मीडियावरच्या अन्य लेखांचेही लेखक कळले तर बरं होईल. सध्या ते अज्ञात category त आहेत.

  6. kiran bhide

      8 वर्षांपूर्वी

    शेफाली जी, हा लेख whatsapp वरून घेतलाय आणि त्यामुळे सोशल मीडियावरून घेतल्याचा उल्लेख त्यात आहेच. मला नेहेमीच आश्चर्य वाटत असतं की एव्हढे intelligent लेख, व्यंगचित्र, विनोद बिना लेखकाचे नाव कसे viral होतात. आज आता कळलंय तर १००% तुमच्या नावावरच तो जाईल. पुनश्चची भूमिकाच लेखकांच्या बाजूची आहे. तुमचं अजून लिखाण वाचायला आवडेल. कुठे मिळेल?

  7. Prasad bhide

      8 वर्षांपूर्वी

    Shefali Vaidya is the author of this piece. Hope she will be mentioned in credit.

  8. Shefali Vaidya

      8 वर्षांपूर्वी

    This was written by me. Please give due credits. Shefali Vaidya

  9. रवि वाळेकर

      8 वर्षांपूर्वी

    झकास! लेखक आहे मोठा ताकदीचा! निरनिराळ्या लेखंकाच्या शैलीचे निरीक्षण अफाट!



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts