न हसणाऱ्या वाचकांचा मी ऋणी आहे

पुनश्च    वसंत सरवटे    2020-07-25 06:00:37   

अंक : ललित - दिवाळी १९६९ लेखाबद्दल थोडेसे : बुद्धीगम्य विनोद आपल्याला खळखळून हसवत नाही, तो केवळ गालावर खळी पाडतो. परिस्थितीजन्य विनोद कोणालाही रिझवू शकतो. भाषा, समाज, संस्कृती यावरील शाब्दिक कोट्या कळायला वाचन, समज आणि आकलन तिन्हीची गरज असते. वसंत सरवटे यांनी व्यंगचित्रकार म्हणून नेहमीच बौद्धिक विनोदाची कास धरली. त्यांच्या एका चित्रात बंगल्याला 'नेस्ट' असे नाव दिलेली व्यक्ती फाटकावर बसलेल्या पक्ष्यांना काठीने उडवून लावत असल्याचे रेखाटले होते. ही गंमत कळायला चित्र निट बघावे लागते. एकदा त्यांनी कोल्हापुरी चपलांचा जोड चित्रात दाखवला होता. त्यात एक चप्पल दुसरीला म्हणते, अगं आपण आयुष्यभर कोल्हापुरात राहिलो, पण अंबाबाईचं दर्शन काही घेता आल नाही आपल्याला... तर असे हे वसंत सरवटे केवळ उत्तम चित्रकारच नव्हते, तर लेखकही तेवढेच उत्तम होते, त्यांचे निरिक्षण अफाट होते, याचा प्रत्यय हा लेख देतो. तो हसवतो, खळी पाडतो, चकीत करतो आणि आपल्याला  अनुभवश्रीमंत करतो. हा लेख वाचल्यावर असं वाटेल की आजचा शनिवार सार्थकी लागला! ललित दिवाळी अंकात १९६९ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** माझे न हसणारे वाचकही अनेक आहेत अन् त्यांची मधूनमधून भेट होत असते. विशेषतः कलाक्षेत्रापासून संपूर्णपणे भिन्न असलेल्या स्थापत्यशास्त्राच्या विश्र्वात मी काम करीत असल्याने माझ्या आजूबाजूच्या अनेकांचा साहित्याशी किंवा चित्रकलेशी क्वचितच संबंध आलेला असतो. त्यामुळे न हसणारे वाचक कोणत्याही क्षणी समोर येण्याची शक्यता मी गृहित धरलेली आहे, त्यामुळे मी त्यांना तसा मुळीच बिचकत नाही. मुळीच बिचकत नाही म्हणजे जेव्हा अशा वाचका ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , ललित

प्रतिक्रिया

  1. sanketk260@gmail.com

      4 वर्षांपूर्वी

    लेख छान आहे.

  2. vineshsalvi21

      4 वर्षांपूर्वी

    'खडा मारायचाच झाला तर ...'फार सुंदर पुस्तक आहे.

  3. mukunddeshpande6958@gmail.com

      4 वर्षांपूर्वी

    वाह, मार्मिक लेख

  4. Sangeeta Gokhale

      4 वर्षांपूर्वी

    Write ups are nice

  5. Chandol Deshpande

      4 वर्षांपूर्वी

    छान.वाचून आनंदझाला.

  6. ppkchemicals@gmail.com

      4 वर्षांपूर्वी

    विनोद समजयाला एक दृष्टि लागते

  7. rajandaga

      4 वर्षांपूर्वी

    उत्तम

  8. hemant.a.marathe@gmail.com

      4 वर्षांपूर्वी

    खुपच छान व ताजा लेख आहे असेच वाटते आहे। विनोद समजावणे हे खरच विचित्र आहे।

  9. atmaram-jagdale

      4 वर्षांपूर्वी

    आवडला लेख . त्यांच्या चित्रांइतकाच निरागसपणे मांडला आहे व्यंगचित्र समजून घेणे ' वाचणे हा एक अनुभवच असतो . मला वाटतं पुल देशपांडे ' जयवंत दळवी इत्यादींच्या पुस्तकांची जास्तीची शोभा वसंत सरवटे यांच्या चित्रांनी वाढवली .

  10. chandratre_adv@yahoo.co.in

      4 वर्षांपूर्वी

    छान लेख.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts