अंक : आलमगीर, दिवाळी १९५९ मी इंग्रजी शाळेत शिकत असताना ना. गोखले हा एक चारचौघे जमले असता टवाळी करण्याचा आवडता विषय होता. त्यावेळी हिंदुपंच नावाचे एक सचित्र विनोदी पत्र निघत असे. त्यातील विनोद म्हणजे शुद्ध टवाळी आणि नालस्ती असे. गेल्या पन्नास वर्षांत विनोदाचा अर्थ, आशय आणि उद्दिष्ट यांत फारसा बदल झाला नाही. हिंदुपंचांत गोखले, फिरोजशहा मेथा, दाजी आबाजी खरे, भांडारकर, चंदावरकर इत्यादी नेमस्त आणि सुधारक पुढाऱ्यांची नेहमी व्यंगचित्रे येत असत. पंच आजोबा दाजी, आबाजी यांना 'दाजाय', 'आबजाय' म्हणत. मेहथा आणि गोखले यांना बहुधा त्यांचा पेहराव दिलेला असे. आणि दोघांचीही चित्रे एकत्र असल्यास एक सासूबाई आणि दुसरा सून असे. मेथांच्या हातांत बहुधा भले मोठे लाटणे असे. शिवाय भरघोस कल्ले आणि मिशा आणि डोक्यावरून लुगड्याचा पदर. पंच आजोबांची गोखल्यांवर विशेष मेहरनजर होती. गोखल्यांना ते कधी गाढव बनवीत तर कधी मरतुकडे तट्टू. पुष्कळ वेळा गोखल्यांना पोपट बनवून ते विलायतला उडत जात आहेत असे दाखवीत असत. मला मोठी गंमत वाटायची. हिंदुपंच आला म्हणजे त्यांची मी चित्रांची पुरवणी पाहात असे. भोवतालची मोठी माणसे तेच करीत. आणि त्या चित्रांवरून आपली राजकीय मते बनवीत आणि सुधारीत. हिंदुपंच पन्नास वर्षांपूर्वी, सर्वसामान्य महाराष्ट्राच्या संस्कृतीचे बॅरॉमीटर होते! या व्यंगचित्रांनी त्या जमान्यात फार मोठी कामगिरी बजावली. गोखल्यांविषयी बहुसंख्य लोकांचे मन कलुषित आणि विकृत करून टाकले. गांधीजींनी गोखल्यांचे उज्ज्वल स्वर ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
prashant1414joshi@gmail.com
5 वर्षांपूर्वीवि. द. घाटे सुंदर ललित लेखन करीत , पण एक वेगळेच नीर क्षिर बुध्दी असलेले विचारवंत होते हे ह्या लेखाने सिद्ध झाले ... धन्यवाद
Prafull prakash sawane
7 वर्षांपूर्वीChatting
सुबोध केंभावी
7 वर्षांपूर्वीभारत एक खोज मालिकेतील भाग ४८ आठवला. ह्या भागात मोहन गोखलेंच्या अभिनयातून गोपाळकृष्ण गोखले साकारले आहेत. नेहरूंच्या दृष्टिकोनातून मांडलेला गोखले-टिळक संघर्ष आहे. भारत एक खोज. भाग ४८. https://www.youtube.com/watch?v=BlUL_8U3QHQ
Baburao
7 वर्षांपूर्वीटिळक- गोखले;टिळक-आगरकर यांचे मैंत्र आणि मतभेद शिवाय ते व्यक्त होण्याची पद्धती याबद्दल खेद-आश्चर्य अशी संमिश्र भावना मनात निर्माण होते.आता सारा इतिहास स्थितप्रज्ञ वृत्तीने वाचू म्हटले की वाटते…अरेरे ही डोंगराएव्हढी माणसंही अशी परस्परांशी का वागावीत… मिळून राहिली असती तर इतिहास बदलण्याची क्षमता त्यांच्यात होती…काश अगर ऐसा होता तो…!
मोहिनी पिटके
7 वर्षांपूर्वीइतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत . थोर समाजसेवक , विचारवंत , लेखक, कलावंत यांच्यात असे विविध प्रकारचे मतभेद होते . यात चूक बरोबर असे काहीही नाही . व्यक्तीची मानसिकता आणि परिस्थितीचा रेटा यावर त्याची कृती अवलंबून असते .